

मुंबई पोलिस सध्या फसवणुकीच्या प्रकरणात शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा याची चौकशी करत आहेत. या दरम्यान राजने एक धक्कादायक खुलासा केला आहे. राजच्या मते त्याने या रकमेचा एक हिस्सा अभिनेत्री बिपाशा बासु आणि नेहा धुपियाला दिला आहे. त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून नेहा आणि बिपाशाला पैसे दिले गेले आहेत. अर्थात त्याने अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना उत्तरे देणेही टाळले आहे. त्यामुळे त्याला परत चौकशीला तोंड द्यावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. (Latest Entertainment News)
तपासादरम्यान समोर आले की कंपनीच्या खात्यातून पैसे काही अभिनेत्रीच्या खात्यावर ट्रान्सफर केले गेले आहे. ज्यामध्ये शिल्पा शेट्टी, बिपाशा बसू आणि नेहा धुपिया यांचे नाव आहे. याशिवाय काही व्यवहार बालाजी एंटरटेनमेंट नावाच्या कंपनीशी जोडले आहेत.
आतापर्यंत राज कुंद्राने केलेल्या 25 कोटीच्या व्यवहारांचा तपास लावला गेला आहे. नोटबंदीच्या दरम्यान काही संशयास्पद व्यवहारही नोंदवले गेले आहेत.
पोलिस सध्या बेस्ट डिल या टाइटलखाली असलेल्या व्यवहाराचा शोध घेत आहेत. राजने हे सर्व पोलिसांना सोपवल्याचे सांगितले आहे. पण अजूनही काही खास हाती न लागल्याने पोलिस पुन्हा एकदा याचा तपास करणार आहेत.
उद्योजक दीपक कोठारी यांच्या तक्रारीवरुनच 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा शिल्पा आणि राजवर गुन्हा दाखल झाला आहे. शिल्पा आणि राज बेस्ट डील टीव्हीचे डायरेक्टर होते. 2015 ते 2023 या काळात दीपककडून शिल्पाच्या कंपनीने कर्ज घेतले. पण ही रक्कम टॅक्स वाचवण्यासाठी गुंतवणूक म्हणून दाखवली. पैसे परत मागितल्यावर या दोघांनी टाळाटाळ केली. पण अचानक शिल्पाने या डायरेक्टर पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे शिल्पाच्या कंपनीवर फसवणुकीचा आरोप दाखल झाला आहे.