

baahubali-3 no plans confirmed producer shobu yarlagadda
मुंबई - 'बाहुबली' फ्रेंचायजीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. ‘बाहुबली’चे निर्माते शोबू यारलागड्डा यांनी स्पष्ट केलं आहे की, सध्या ‘बाहुबली ३’ वर कोणतेही काम सुरू नाही. यामुळे प्रभासच्या चाहत्यांना थोडी निराशा झाली आहे. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत शोबू यारलागड्डा म्हणाले, “आमच्याकडे सध्या ‘बाहुबली ३’ साठी कोणतीही ठोस योजना नाही. लोक सतत विचारतात, पण सध्या आम्ही इतर प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहोत.”
'बाहुबली'चे निर्माते शोबू यारलागड्डा यांनी पुष्टी केली आहे की, बाहुबलीतील तिसरा पार्टवर सध्या काम होत नाहीये. एका मुलाखतीत, यारलागड्डा यांनी 'बाहुबली ३' बद्दलच्या चर्चांना उत्तर दिले आणि स्पष्ट केले की, बाहुबली सिक्वेलची तात्काळ कोणतीही योजना नाही.
'बाहुबली' और 'बाहुबली २' बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. सध्या दोन्ही चित्रपट मिळून 'बाहुबली: द एपिक' बनवले गेले आहे, जो ३१ ऑक्टोबर रोजी रिलीज होईल. त्यांनी स्पष्ट केलं की, 'बाहुबली: द एपिक' चर्चे दरम्यान, 'बाहुबली ३' ची कोणतीही घोषणा केली जाणार नाही.
एका वेबसाईटनुसार, निर्माता शोभू म्हणाले, "बाहुबली ३ नक्कीच बनत आहे, पण, अद्याप त्यावर काम होणं बाकी आहे.'' प्रेक्षकांसाठी सरप्राईज होऊ शकतं, ज्या बद्दल खुलासा चित्रपटाच्या अखेरीस केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
प्रभास सध्या ‘द राजा साब’ आणि ‘कांता’ या मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे, तर राजामौली महेश बाबूसोबत एका ग्लोबल अॅक्शन अॅडव्हेंचरवर काम करत आहेत. त्यामुळे ‘बाहुबली ३’ला अजून बराच काळ वाट पाहावी लागेल, हे स्पष्ट आहे.