

Vijay Deverakonda Car Accident first statement tweeted
मुंबई - टॉलीवुडचा लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा याच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. विजयचा कार अपघात झाला असून त्याच्या डोक्याला किरकोळ मार लागल्याची माहिती समोर आली आहे. तेलंगणाच्या जोगुलांबा गडवाला जिल्ह्याजवळ कार अपघातातून तो सुखरूप बचावला आहे. विजय देवरकोंडाने चाहत्यांना या घटनेत कोणतीही दुखापत झाली नसल्याचे सांगितले.
सोमवारी झालेल्या अपघातानंतर अभिनेता विजय देवरकोंडाचे चाहते चिंतेत पडले होते. अनेकांनी सोशल मीडियावर कॉमेंट केले. पण, खुद्द विजयने त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. त्याने एक्स अकाऊंट वर एक ट्विट करून त्याच्या प्रकृतीबद्दल सांगितले.
''आम्ही सर्व जण ठिक आहोत. कारचे नुकसान झाले आहे. पण आम्ही ठिक आहोत. आम्ही स्ट्रेंथ वर्कआऊट देखील केला आणि आचा घरी परतलो आहोत. डोक्याला लागलं आहे..दुखत आहे..पण बिर्याणी आणि झोपेने काही होणार नाही. तर आपल्या सर्वांना खूप प्रेम आणि आलिंगन. या बातमीमुळे चिंता करू नका.''
जोगुलंबा गडवाला जिल्ह्यातील उंडावल्लीजवळ जेव्हा तो पुट्टपर्तीहून हैदराबादला जात होता, तेव्हा अपघात झाा. दुसरी गाडी अचानक वळली आणि विजयच्या कारला धडकली. पण, सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.
पोलिसांनी अपघाताबद्दल अधिक माहिती देताना म्हटले की, "अभिनेता विजय देवेराकोंडा दुपारी ३ वाजताच्या सुमारास पुट्टपर्तीहून हैदराबादला जात असताना समोरून येणारी एक बोलेरो गाडी अचानक उजवीकडे वळली, ज्यामुळे त्याची गाडी डाव्या बाजूला धडकली. विजय आणि इतर दोघेजण कारमध्ये होते...''
देवेराकोंडा अपघाताच्या आदल्या दिवशी त्याच्या कुटुंबासह श्री सत्य साई बाबांच्या प्रशांती निलयम आश्रमात गेला होता. यावेळचे त्याचे फोटो व्हायरल झाले होते.
विजय देवरकोंडा हा 'अर्जुन रेड्डी', 'लिगर', 'डिअर कॉम्रेड', 'गीतागोविंदम' या चित्रपटांमुळे प्रचंड लोकप्रिय झाला.