

कॉमेडियन भारती सिंहने सिंह आणि लिंबाचिया परिवाराला मोठे सरप्राईज दिले आहे. वयाच्या ४१ व्या वर्षी ती आई होणार आहे.
Bharti Singh second child big surprise viral photos
मुंबई – कॉमेडी जगतात आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी भारती सिंह पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण आहे तिच्या वैयक्तिक आयुष्यातील मोठी बातमी. वयाच्या ४१ व्या वर्षी भारती पुन्हा आई होणार असल्याचं समोर आलं आहे. या आनंदाच्या बातमीने संपूर्ण सिंह आणि लिंबाचिया परिवारात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.
भारती आणि हर्ष लिंबाचिया हे बॉलिवूडमधील सर्वात लव्हेबल कपल्सपैकी एक मानले जातात. २०२२ साली या दाम्पत्याला मुलगा झाला होता, त्याचं नाव त्यांनी ‘गोलू’ ठेवलं आहे. आता भारती पुन्हा आई होणार असल्याचं कळताच चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
भारतीने नुकत्याच आपल्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती ‘सरप्राईज देणार आहे’ असं सांगते. काही तासांतच या व्हिडिओवर लाखो व्ह्यूज आले. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि हर्षसोबतची केमिस्ट्री पाहून चाहत्यांनी लगेचच अंदाज बांधला की काहीतरी खास घडणार आहे. आणि तसं झालंही — भारतीने पुन्हा एकदा ‘गुड न्यूज’ दिली आहे.
भारतीने सोशल मीडियावर फॅन्ससोबत एक फोटो शेअर करत ही आनंदाची वार्ता दिली. पती हर्ष सोबतचा एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो खूप व्हायरल होत आहे. Baby Number 2 Coming! Excited? 🍼🥹❤️ अशी कॅप्शन लिहित तिने रेड हार्ट इमोजी शेअर केला आहे. या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारती आणि हर्ष या दोघांनीही आपल्या चाहत्यांचे प्रेम आणि शुभेच्छांसाठी आभार मानले आहेत.
भारतीच्या करिअरबद्दल बोलायचं झालं, तर ती स्टँडअप कॉमेडी शोमधून प्रचंड प्रसिद्ध झाली. सध्या ती विविध रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन करते आणि स्वतःचं डिजिटल चॅनलही चालवते.