Baaghi 4-Bengal Files BO Collection | 'बागी-४' चा धमाका तर बंगाल फाईल्सची कमाई किती कोटींवर?

Baaghi 4-The Bengal Files BO Collection | 'बागी-४' चा बॉक्स ऑफिसवर धमाका तर बंगाल फाईल्सची कमाई किती कोटींवर?
image of Baaghi 4 and The Bengal Files movie poster
Baaghi 4-The Bengal Files BO CollectionInstagram
Published on
Updated on

Baaghi 4-The Bengal Files Box Office Collection

मुंबई - 'बागी-४' या टायगर श्रॉफ स्टारर चित्रपटाने त्याच्या ओपनिंगला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. त्याच्या तुलनेत 'द बंगाल फाईल्स' मागे पडला आहे. चित्रपटाच्या रिलीजपूर्वी २.७५ कोटींचे अॅडव्हान्स बुकिंग झाले. यामुळे ओपनिंगला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी चिन्हं होती. त्यामुळे जो अंदाज वर्तवला होता, त्यानुसार, पहिल्या दिवसाचे कलेक्शन १३.२० कोटी नेट, तर ग्रॉस १५.७१ कोटी भारतात आणि १.०६ कोटी परदेशात असे एकूण जगभरातील कलेक्शन १६.७७ कोटी झाले आहे.

या ओपनिंगने ‘बागी २’ आणि ‘बागी २’ चा पहिला दिवसाचा विक्रम मोडला नाही. याचवेळी प्रदर्शित झालेला ‘The Conjuring: Last Rites’ भारतात तब्बल १८ कोटींची कमाई करून ‘बागी ४’ पेक्षा वरचढ ठरलाय.

image of Baaghi 4 and The Bengal Files movie poster
Ashish Warang Death: ‘सूर्यवंशी’ फेम कॉन्स्टेबल आशीष तांबे यांचे निधन

टायगर श्रॉफ, संजय दत्त, सोनम बाजवा आणि हरनाज संधू यांचा ॲक्शन-थ्रिलर चित्रपट ‘बागी ४’ ५ सप्टेंबर रोजी रिलीज झाला. या फ्रँचायजीचे तीन भाग आले आहेत. पण यावेळी चौथ्या भागात टायगरचे हाय लेव्हल ॲक्शन दिसले आहे. माहितीनुसार, ‘बागी ४’ ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १२ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. पण कलेक्शनच्या बाबतील ‘द कॉन्ज्यूरिंग: लास्ट राईट्स’ पुढे गेला.

image of Baaghi 4 and The Bengal Files movie poster
Amitabh Bachchan | 'लालबागचा राजा’ साठी अमिताभ बच्चन यांनी दान केले ११ लाख; पण नेटकऱ्यांचा प्रश्न वेगळाच!

‘द बंगाल फाईल्स’चे स्ट्रगलिंग मोड

रिपोर्टनुसार, द बंगाल फाईल्सने पहिल्या दिवशी १.७५ कोटींची कमाई केली. हॉलिवूड आणि हिंदी रिलीज चित्रपटांच्या तुलनेत विवेक अग्निहोत्रीं यांच्या या चित्रपटाची ओपनिंग २ कोटींपेक्षा कमीच राहिली. ‘द बंगाल फाईल्स’ रिलीज आधी वादग्रस्त ठरला होता. बागी ४ सोबत हा चित्रपट देखील ५ सप्टेंबर रोजी रिलीज झाला. पण प्रेक्षकांकडून खास रिस्पॉन्स मिळाला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news