

मुंबई - हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये अनेक भूमिका साकारणारे अभिनेते आशीष वारंग यांनी जगाचा निरोप घेतला आहे. सूत्रांनुसार, ते दीर्घकाळ आजारी होते. आशीष यांचे बंधू अभिजीत वारंग यांनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर करून या वृत्ताची पुष्टी केली आहे. अभिनेते आशीष यांना अखेरीस रोहित शेट्टी यांचा चित्रपट ‘सूर्यवंशी’मध्ये पाहण्यात आलं होतं.
आशीष वारंग यांनी बॉलीवूड सूर्यवंशीसह दृश्यम, मर्दानी यासारख्या अनेक चित्रपटामध्ये भूमिका साकारल्या आहत. सहाय्यक अभिनेता म्हणून त्यांनी या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
अभिजीत वारंग यांनी सोशल मीडियावर लिहिलंय- “वारंग आशीष दादा, तुम्हाला खूप मिस करू. आधी तुम्ही एअर फोर्स ऑफिसर म्हणून देश सेवा केली आणि नंतर अभिनयाच्या कौशल्यातून देशाचं मन जिंकलं.”
त्यांनी पुढे लिहिलंय-आम्ही एक चांगला व्यक्ती गमावला. आम्ही तुम्हाला खूप आठवण करू, मोठे भाऊ.
अभिजीत यांच्या या पोस्ट नंतर सोशल मीडियावर दु:ख व्यक्त केले जात आहे. चित्रपटात येण्यापूर्वी आशीष वारंग भारतीय हवाई दलात एक अधिकारी होते. मुख्य भूमिकांमध्ये अधिक काम केलं नसलं तरी अनेक मोठ्या चित्रपटात आणि टीव्ही शोजमध्ये एक प्रसिद्ध चेहरा बनले होते.
त्यांनी रोहित शेट्टीचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘सूर्यवंशी’मध्ये (२०२१) कॉन्स्टेबल आशीष तांबेची भूमिका साकारली होती., ‘दृश्यम’, ‘एक विलेन रिटर्न्स’ आणि वेब सीरीज ‘द फॅमिली मॅन’मध्येही ते दिसले होते.