

Baaghi 4 Teaser Out Now
मुंबई - टायगर श्रॉफचा फ्रेंचायझी चित्रपट बागी ४ ची उत्सुकता सिनेप्रेमींनी लागून राहिली असताना आता चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. १ मिनिट ४९ सेकंदाचा हा टीझर असून टायगर तगडी ॲक्शन करताना दिसत आहे. या दमदार टीजरवर खूप साऱ्या कॉमेंट्स येत असून यावेळची बागी देखील सुपरहिट होईल असे म्हटले जात आहे.
टायगर श्रॉफने सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट लिहून टीझर शेअर केला आहे. त्याने टीझर व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे - 'हर आशिक एक विलेन है..सुटका नाही. दया नाही. स्वतःला तयार ठेवा -एक रक्तरंजित, हिंसक प्रेमकहाणी सुरू होते'. लोबतच त्याने रेड हार्ट इमोजी आणि फायर इमोजी शेअर केला आहे.
साजिद नाडियाडवालाच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन ए. हर्षा यांनी केले आहे. हा चित्रपट ५ सप्टेंबर रोजी रिलीज होईल. 'बागी ४' मध्ये सोनम बाजवा आणि माजी मिस युनिव्हर्स हरनाज संधू दिसणार आहे तर संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत असेल.
सोशल मीडियावर टीझर पाहिल्यानंतर चित्रपट ॲनिमल आणि किलची आठवण येईल. कारण, दंगा - मारझोड दरम्यान गायक ब्री प्राकच्या आवाजात टीझर ऐकू येतो. हे ऐकून ॲनिमलची कॉपी केल्यासारखं वाटेल.
टीझरच्या सुरुवातीला संजय दत्त दिसतो. कशाप्रकारे टायगर सोनम बाजवाची आठवण करत असतो..आणि त्यानंतर टायगरचा डायलॉग ऐकू येतो की-'बचपन में मां से एक कहानी सुनी थी. एक हीरो और एक विलेन की, तब पता नहीं था कि मेरी कहानी का हीरो और विलने में ही रहूंगा.' यानंतर रक्तरंजित संघर्ष सुरु होतो. टीझरमध्ये हरनाज संधू-सोमन बाजवा देखील कत्ल-ए-आम करताना दिसत आहेत.