

Mahavatar Narsimha Collection latest updates
मुंबई - 'महावतार नरसिंह' बॉक्स ऑफिसवर कमालीची जादू दाखवत आहे. तिसऱ्या आटवड्यात या चित्रपपटाने कमालीच्या आकड्यांची जादू दाखवलीय. सिनेप्रेमींसाठी हे खास सरप्राईज आहे. कारण रिलीज पूर्वी कोणताही तर्क बांधला नव्हता की, हा चित्रपट हिट ठरेल. एकीकडे बॉलीवूडपट 'सैयारा' यावर्षीचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरले आहे. तर कन्नड चित्रपट 'सू फ्रॉम सो' देखील दमदार आहे. पण थिएटरमध्ये एक भारतीय ॲनिमेशन चित्रपट सर्वात मोठा धमाका करेल, असे वाटले नव्हते.
'महावतार नरसिंह'ने ८ कोटींच्या कलेक्शनसोबत बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा आकडा पार केला होता. रिपोर्टनुसार, यानंतर चित्रपटाची कमाईची गती कमी झाली. गुरुवारी ५.३५ कोटी रुपये कमावले. पण पुन्हा नंतर आठवड्याच्या शेवटी कमाईची आकडे वाढले.
शुक्रवार -७.५ कोटी
शनिवार - २०.२५ कोटी
रविवार - २२.७५ कोटी
तिसऱ्या आठवड्यात वीकेंडमध्ये 'महावतार नरसिंह'चे कलेक्शन ४४.७४ कोटी रुपये आहे. पहिल्या आठवड्यात १५.८५ कोटी आणि दुसऱ्या आठवड्यात ४६.२ कोटींचे कलेक्शन केलं होतं.
प्रत्येक आठवड्याचे कमाईचे आकडे -
पहिला आठवडा- ३२.६३ कोटी
दुसरा आठवडा - ५५.१७ कोटी
तिसरा आठवडा- ३८.९६ कोटी
एकूण : १२६.७६ कोटी
'महावतार नरसिंह' पाच भाषांमध्ये रिलीज झाला आहे. शनिवारी, चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने बॉक्स ऑफिसवर शंभर कोटींचा आकडा पार केला. १७ दिवसांत आतापर्यंत १६८ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. केवळ हिंदी भाषेतील चित्रपटाने १२६ कोटींहून अधिक गल्ला जमवला. ट्रेड रिपोर्ट्सनुसार, 'महावतार नरसिंह'चे बजेट फक्त १५ कोटी आहेत.