

Hrithik Roshan and jr ntr war 2 advanved booking
मुंबई : ऋतिक रोशन-ज्युनियर एनटीआरचा वॉर २ रिलीज होण्याआधी कोटींची कमाई केलीय. ऋतिक रोशनची इतकी क्रेझ आहे की, त्याच्याविषयी जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत. लोक ऋतिक आणि सबा आजाद यांचे वय शोधत असून दोघांमधील अंतरदेखील शोधत आहेत.
१४ ऑगस्टला वॉर २ रिलीज होणार आहे. ज्यु. एनटीआर, ऋतिक रोशन सोबत कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत आहे. दरम्यान, वॉर २ चे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले असून लोक तिकिट्स खरेदी करत आहेत.
वॉर २ चा ट्रेलर इतका दमदार आहे की, सिनेप्रेमींमध्ये या चित्रपटाचे प्रचंड बझ आहे. वॉर २ च्या ॲडव्हान्स बुकिंग परदेशात आधीच सुरु झाली होती. आता भारतात कोटींची कमाई केली आहे.
रिपोर्टनुसार, वॉर-२ ॲडव्हान्स बुकिंगमध्ये आतापर्यंत ५.६२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामध्ये ब्लॉक सीट्स समाविष्ट असून ६७२३ शोजसाठी ५५७७३ इतकी तिकिट विक्री झालीय.
वॉर २ मध्ये फॅन्सना जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये ऋतिक - एनटीआर प्लेनवर ॲक्शन करताना दिसणार आबेत. सोबत ऋतिक रोशन-कियारा आडवाणीचा रोमान्स देखील पाहायला मिळणार आहे.