

टायगर श्रॉफच्या बागी 4 ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. जबरदस्त अॅक्शनची मेजवानी या सिनेमात चाहत्यांना अनुभवता येणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने बऱ्याच काळाने टायगरलाही यशाची चव चाखता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (latest Entertainment News)
बागीच्या प्री सेल्स बुकिंगला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. हा सिनेमा 5 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या बुकिंगने आतापर्यंत आशादायक चित्र उभे केले आहे.
अॅक्शन फ्रंचाईजी असलेल्या बागीचा पहिला सिनेमा 2016 मध्ये रिलीज झाला होता. त्यानंतर 2018 मध्ये बागी 2 प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तर 2020 मध्ये बागी 3 ने बॉक्स ऑफिसवर धमाका केला.
बागी 4 मध्ये टायगरसोबत संजय दत्त दिसत आहे. ट्रेलरमध्ये दिसलेल्या धुवांधार अॅक्शनने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. यादिवशी बागीसोबत बंगाल फाईल्स हा सिनेमा रिलीज होणार आहे. पण सिने समीक्षकांच्या मते, या रिलीजचा बागीवर कोणताही परिणाम होणार नाही.
बुधावारी रात्री पर्यंत बागी 4 ने 2.83 कोटींची कमाई केली होती. एकूण यात ब्लॉक सीटची बुकिंग ग्राह्य धरली तर कमाईचा आकडा 5.26 कोटी रुपये इतका आहे.
2023 मध्ये आलेल्या गणपतचे एकूण 3 कोटी इतके अॅडव्हान्स बुकिंग झाले होते. तर त्याच्या आदल्या वर्षी 2022 मध्ये हिरोपंती 2 साठी 5.20 कोटींची अॅडव्हान्स बुकिंग झाले होते. त्यामुळे या सगळ्यात सध्या बागी 4 चे पारडे तुलनेने जड आहे.
साजिद नाडियाडवाला प्रॉडक्शन खाली बनलेल्या बागी 4 मध्ये टायगर शिवाय हरनाज संधु, सोनम बाजवा आणि श्रेयस तळपदे दिसणार आहे. तर संजय दत्त यात नेहमीप्रमाणे एका दमदार रोल मध्ये आहे.