

मराठी मालिकांच्या विश्वात दर आठवड्याला एक नवीन अपडेट समोर येत असते. कधी एखाद्या मालिकेत नव्या कलाकाराची एंट्री असते तर कधी एखाद्या मालिकेत हटके ट्विस्ट येत असतो. काही मालिका अचानक लिप घेतात. पण यादरम्यान कलाकार बदलतात. अनेकदा कथानकातही बदल होताना दिसतात. (Latest Entertainment News)
पण स्टार प्रवाहवरील एक मालिका मात्र प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसत आहे. अलीकडेच शिवानी सुर्वेची मुख्य भूमिका असलेला थोड तुझ थोडं माझ ही मालिका लवकरच निरोप घेणार आहे.
पण या सोबतच आणखी एक मालिका शेवटच्या स्टॉपवर पोहोचणार आहे. ‘ आई आणि बाबा रिटायर होत आहेत' ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अवघ्या दहा महिन्यात ही मालिका ऑफ एअर होते आहे. आई कुठे काय करते ही मालिका संपल्यानंतर ही मालिका सुरू झाली होती.
आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही मालिका दुपारी 2 वाजता प्रसारित होत असे. 13 तारखेला या मालिकेचा शेवटचा एपिसोड रिलीज होण्याची शक्यता आहे. या मालिकेच्या जागी लपंडाव ही मालिका प्रसारित होणार आहे.
ही मालिका ऑफ एअर होणार म्हणल्यावर प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहीनी ही मालिका आवडत असून बंद करू नये असे काही प्रेक्षकांचे मत आहे. तर काहिनी मात्र यावर आनंद व्यक्त केला आहे. बरे झाले एकदाची संपली... अशी कमेन्ट बऱ्याच नेटीझन्सनी केली आहे. यासोबत काहीनी शुभविवाह, मुरांबा आणि अबोली या मालिका संपवण्याचीही मागणी केली आहे.
या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ, मंगेश कदम, हरिश दुधाडे, प्रतीक्षा जाधव यांच्या मुख्य भूमिका आहेत.