

बालिका वधु फेम अविका गौरने अखेर लॉन्ग टाईम बॉयफ्रेंड सोबत विवाह केला. मिलिंद चंदवानी असे तिच्या पतीचे नाव असून हे कपल पती, पत्नी और पंगाच्या सेटवर विवाहबद्ध झाले. त्यांचे ब्रायडल फोटोज व्हायरल होत आहेत. या कपलने जूनमध्ये साखरपुडा केला होता.
Avika Gor-Milind Chandwani wedding
मुंबई - छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अविका गौरने अखेर लग्नगाठ बांधली आहे. ‘बालिका वधू’ या सुपरहिट मालिकेत आनंदीच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली अविका गौर आता आयुष्यातील नव्या पर्वाला सुरुवात केली आहे. तिने आपल्या लॉन्ग टाईम बॉयफ्रेंड मिलिंद चंदवानीसोबत सात फेरे घेतले.
अविका आणि मिलिंद मागील पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यांची लव्ह स्टोरी नेहमीच चर्चेचा विषय ठरली होती. शेवटी या सुंदर जोडीने लग्न करून आपल्या नात्याला नवी दिशा दिली. त्यांच्या लग्नातील फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांना फॅन्सकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.अविकाने सोशल मीडियावर लग्नातील सुंदर क्षाणांचे फोटो शेअर केले आहेत.
हा लग्न सोहळा अतिशय सुंदर आणि खास पद्धतीने पार पडला. अविका पारंपरिक लाल लेहेंगामध्ये अप्सरेसारखी दिसत होती, तर मिलिंदने रॉयल शेरवानीत आपला स्टाईलिश लूक दाखवला. मिलिंद लग्न मंडपात स्कूटरवरून पोहोचला. ढोल नगारेंच्या ताशात मिलिंदने ताल धरला. यावेळचे त्याचे डान्सचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
‘बालिका वधू’ मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलेली अविका गौरने नंतर अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले. लग्नानंतर अविका गौरने सोशल मीडियावर फोटो शेअर करत लिहिले, Baalika se Vadhu tak. फॅन्सनी या नव्या जोडप्याला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांनी “बालिका वधूची आनंदी आता खऱ्या अर्थाने दुल्हनिया झाली” अशा कमेंट्स करून आनंद व्यक्त केला.
मिलिंद चंदवानी सोशल वर्कर आहे. मिलिंद आणि अविकाची भेट २०१९ मध्ये झाली होती. २०२० पासून दोघांनी एकमेकांना डेटिंग करणे सुरु केले. पाच वर्षे डेटिंग नंतर मिलिंदने अविकाला प्रपोज केलं. ११ जून रोजी एक भावूक इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून तिने साखरपुड्याची घोषणा केली.