

First Look of Akshaye Khanna from Mahakali
मुंबई - अभिनेता अक्षय खन्नाने 'छावा' चित्रपटात औरंगजेबच्या भूमिका साकारून चर्चेत आला होता. आता छावानंतर तो नव्या चित्रपाटतून पुन्हा चर्चेत आला आहे. कारण आहे महाकाली चित्रपट. त्याची चित्रपटातील पहिली झलक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅन्स त्याचा लूक आणि नवा अंदाजाचे कौतुक करत आहेत.
पौराणिक कथेवर आधारित नवा चित्रपट 'महाकाली'मध्ये असुर गुरु शुक्राचार्यच्या भूमिकेत तो दिसणार आहे. त्याचा गेटअप, डोळ्यांतील तीव्रता आणि पौराणिक अंदाज फॅन्सच्या पसंतीस उतरले आहे. अक्षय खन्नाच्या अभिनय कौशल्यामुळे त्याच्या शुक्राचार्यच्या भूमिकेवर विशेष लक्ष केंद्रीत आहे. औरंगजेबसारखी भूमिका आणि आता असुर गुरु शुक्राचार्य – या दोन वेगळ्या व्यक्तिरेखा साकारणं त्याच्यासाठी आव्हानात्मक असेल, असे फॅन्सचं म्हणणं आहे.
प्रशांत वर्मा दिग्दर्शित 'महाकाली' चित्रपट त्यांचा 'प्रशांत वर्मा सिनेमॅटिक युनिव्हर्स'चा एक भाग आहे. अक्षयचा शुक्राचार्य अवतार खूप दमदार दिसत आहे. पांढरी दाढी, लांब केस आणि गंभीर चेहरा या लूकची नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे. ही भूमिका पाहून नेटकऱ्यांना अमिताभ बच्चन यांच्या 'अश्वत्थामा'च्या भूमिकेची आठवण येतेय.
चित्रपटाची कथा, अन्य कलाकार आणि रिलीज डेट लवकरच जाहीर होणार आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर अक्षयचा महाकाली लूक चर्चेत आहे.