

Dhana Pisaachi Out Now
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नेहमीच तिच्या हटके अभिनय आणि वेगळ्या स्टाईलमुळे चर्चेत असते. आता तिच्या आगामी जटाधारा चित्रपटातील पहिले गाणं प्रदर्शित झालं असून, 'धना पिसाची' या गाण्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. तिच्या गाण्यातील एक एक स्टेप्स खूप व्हायरल होत आहेत. आतापर्यंत सोनाक्षीचा कधीही न पाहिलेला डान्स या गाण्यातून पाहायला मिळत आहे.
गाणं रिलीज होताच काही तासांत ते लाखो व्ह्यूज पार गेले. विशेष म्हणजे, या गाण्यात सोनाक्षीचा डान्स स्टाईल प्रेक्षकांसाठी मोठं आकर्षण ठरलं आहे. आतापर्यंत सोनाक्षीला चाहत्यांनी स्टायलिश, ग्लॅमरस किंवा भावनिक भूमिकांमध्ये पाहिलं होतं. पण या गाण्यातील तिचा एनर्जीफुल आणि जबरदस्त डान्सिंग अवतार अगदी वेगळाच आहे.
धना पिसाची असे गाण्याचे बोल आहेत. सोनाक्षीचे एक्सप्रेशन्स, तिचा डान्स आणि तिच्या वेषभूषेमुळे या गाण्याचे एक वेगळेपण दिसत आहे. मधुबंती बागची यांनी गायलं आहे तर संगीत समीरा कोप्पिकर यांचे आहे. समीरा कोप्पिकरने म्हटलं की, या गाण्याचा अनुभव खूप अनोखा आणि सुखद आहे. ‘धना पिशाची’ साठी हे एका प्रकारे तांडव सॉन्ग आहे, जो ‘डिव्हाईन फेमिनिन एनर्जी’ला दर्शवतं...”
चित्रपट जटाधारामध्ये सुधीर बाबू, सोनाक्षी सिन्हा, दिव्या खोसला, शिल्पा शिरोडकर, इंदिरा कृष्णा, रवि प्रकाश यासारखे कलाकार दिसणार आहेत. जी स्टुडिओज आणि प्रेरणा अरोरा प्रस्तुत चित्रपट ७ नोव्हेंबर रोजी हिंदी आणि तेलुगु भाषेत रिलीज होईल.