कान्स फिल्म फेस्टिव्हला अमृता फडणवीसांची हजेरी; पहा लूक

कान्स फिल्म फेस्टिव्हला अमृता फडणवीसांची हजेरी; पहा लूक

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रसिद्ध आशा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी असण्यासोबतच त्‍यांचे बहुगुणसंपन्न व्यक्तिमत्व आहे. या फेस्टिव्हलमध्ये अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीने सर्वांनाच एक सुखद धक्का बसला. दीपिका पदुकोणपासून प्रियंका चोप्रा आणि सोनम कपूर यांच्यासह अनेक अभिनेत्रींनी या चित्रपट मोहोत्सवात हजेरी लावली आहे.

अमृता फडणवीस या तशा बँकर म्हणून प्रसिद्ध आहेत. पण यासोबत त्यांनी आपली गायनाची आवडही नेहमीच जोपासली आहे. त्यांनी गायलेली विविध गाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेली आहेत. याचबरोबर त्या सामाजिक क्षेत्रातही कार्यरत असतात. नुकत्याच त्या थेट कान्सच्या रेड कार्पेटवर दिसल्‍या. यावेळी त्यांच्या स्टाईलने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. अमृता फडणवीस यांनी कान्स मोहोत्सवातील खास प्रसंगाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यांना अनेक युझर्सनी लाईक केले आहे.

कान्स मोहोत्सवात हजेरी लावलेल्या अमृता फडणवीस यांनी एक खास स्टाईलचा ड्रेस परिधान केला होता. मुंबईतील फॅशन डिझायनर अदा मल्लिक यांनी हा ड्रेस डिझाइन केला होता.

[box type="shadow" align="aligncenter" class="" width=""]कान्स फिल्म फेस्टिव्हलचे 75 वे वर्षे आहे, यावेळी रेड कार्पेटवर व्यावसायिक मॉडेलसह अमृता फडणवीस.[/box]

[box type="shadow" align="aligncenter" class="" width=""]कान्स फिल्म फेस्टिव्हमधील फोटो सोशल मिडीयावर अमृता फडणवीसांनी शेअर केले. [/box]

[box type="shadow" align="aligncenter" class="" width=""]अमृता फडणवीसांचा कान्समधील लूक [/box]

[box type="shadow" align="aligncenter" class="" width=""] अमृता फडणवीसांच्या लूकची चर्चा [/box]

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news