

Comedian Television Host Kapil Sharma Net Worth:
मुंबई : मेहनत आणि नशीब या दोन्हीची जोड असली म्हणजे कधी कोणाचे सितारे चमकतील सांगता येत नाही. असेच एक नाव सध्या सतत प्रकाशझोतात आहे ते म्हणजे कपिल शर्मा. गायक बनण्याच्या इराद्याने करियर सुरू केलेला कपिल आज 300 कोटी संपत्तीचा मालक आहे. तसेच तो भारतातील सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या टेलिव्हिजन कलाकारांपैकी एक आहे. इथेपर्यंत पोहोचण्याचा कपिलचा संघर्ष सोपा नव्हता.
वडिलांच्या मृत्यूनंतर कपिल हाच त्याच्या घरच्यांचा एकमेव कमाईचा स्त्रोत होता. त्यावेळी छोटी मोठी कामे करणारा कपिल महिन्याला 500 रुपये कमवायचा. त्यानंतर यात थोडी वाढ होऊन तो महिन्याला 900 रुपये इतपत पोहोचला खरं, पण त्याचे ध्येय काही वेगळेच होते. दरम्यान त्याने द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजसाठी ऑडिशन देणे सुरू केले. पण पहिल्यांदा त्याला अपयशच आले. पण यानंतरच्या प्रयत्नात मात्र त्याची या शोसाठी निवड झाली. कपिलच्या टॅलेंटने सगळेच प्रभावित झाले. हा शो कपिलने जिंकला आणि करियरचे नवीन दार उघडले. हा शो जिंकल्यानंतर मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून बहिणीचे लग्न केले.
कपिल शर्मा हा भारतातील सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या टेलिव्हिजन कलाकारांपैकी एक आहे. कपिलकडे अंदाजे 300 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे वृत्त फायनान्शिअल एक्स्प्रेसने दिले होते.
2024 या आर्थिक वर्षात सर्वात जास्त प्राप्तिकर भरणाऱ्या कलाकारांमध्ये त्यांचा क्रमांक लागतो. त्याने जवळपास 26 कोटी रुपये कर स्वरुपात भरले.
कपिलची संपत्ती किती?
> मुंबईतील अंधेरीमध्ये 15 कोटींचे घर आहे. जिथे ती पत्नी आणि दोन मुलांसह राहतो.
> कपिलला आलीशान गाड्यांची आवड आहे. व्होल्वो, मर्सिडीज बेंझ या कंपनीच्या महागड्या गाड्या त्याच्याकडे आहेत.
> कपिलने 5.5 कोटी खर्च करून स्वत:ची एसी व्हॅनिटी व्हॅन विकत घेतलीये. ही व्हॅन म्हणजे एक छोटंस फिरतं घरंच असल्याचं सांगितलं जातं.
> पंजाबमध्ये कपिलचं 25 कोटी रुपयांचं फार्म हाऊस देखील आहे.
> 2013 मध्ये कपिल शर्माने एक पाऊल पुढे नेत स्वत:ची प्रॉडक्शन कंपनी सुरू केली ज्याचे नाव ठेवले k9.
कॅनडात कॅफे
कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया येथे कपिल शर्माने 4 जुलैला कॅफे सुरू केलं. मात्र, अवघ्या काही दिवसांतच या गोळीबाराची घटना घडल्याने हे कॅफे चर्चेत आले होते.
प्रभास, रणवीरपेक्षाही श्रीमंत (Richest Comedian In India)
कपिल हा बॉलिवूडच्या बड्या कलाकारांपेक्षाही श्रीमंत असल्याचा दावाही केला जातो. प्रभासची संपत्ती अंदाजे 241 कोटी रुपये, अजीत कुमारची संपत्ती अंदाजे 196 कोटी रुपये तर रणवीर सिंहची संपत्ती अंदाजे 226 कोटी रुपये आहे. याशिवाय रूपाली गांगुली, तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांसारख्या लोकप्रिय टीव्ही कलाकारांनाही कपिलने मागे टाकले आहे.