

siddhus comeback in the grat kapil sharma show
द कपिल शर्मा शो ने प्रेक्षकांना अनेक वर्षे खळखळून हसवले आहे. याशिवाय या शोने कपिलला देखील रातोरात स्टार बनवले. यानंतर शो प्रसिद्धीच्या शिखरावर असताना शोचे जज नवज्योतसिंग सिद्धू यांनी शो सोडला. यादरम्यान अर्चना पुरन सिंग यांनी या शोचे जज म्हणून काम पाहिले. आता या शोच्या तिसऱ्या सीझनमध्ये नवज्योतसिंग सिद्धू यांची वापसी होणार आहे. या दरम्यान सिद्धू यांनी एक वेगळ्याच चर्चेला तोंड फोडले आहे. एका व्लॉगमध्ये सिद्धू म्हणाले की त्यांनी कपिलला मोठा ब्रेक मिळवून देण्यात खूप मदत केली. यापूर्वी कपिल शर्माची स्वतःची कोणतीही ओळख नव्हती. पण त्यांच्यामुळेच कपिलला हा शो मिळाला.
ते पुढे म्हणाले की, या शोची ऑफर घेऊन कपिल माझ्याकडे आला होता. ही घटना 13 वर्षांपूर्वीची आहे. कपिल लाफ्टर चॅलेंजमधून बाहेर पडल्यानंतर कॉमेडी सर्कसमध्ये त्याला पुढे जाण्यास वाव मिळाला नाही. त्यानंतर तो माझ्याकडे आला, 'जर तुम्ही माझ्या शोचा भाग होण्यासाठी तयार असाल तर त्यामुळे मला एक नवीन शो मिळेल. कलर्सचे प्रमुख राज नायक साहेब यांनी हे कपिलला सांगितले होते. त्यावेळी राज नायक कलर्सचे प्रमुख होते. चॅनेलचा टीआरपी वाढवण्यासाठी मी जज व्हावे अशी इच्छा त्यांनीही व्यक्त केली. त्यानंतर आम्ही भेटलो आणि मी कपिलचा शो करण्यास सहमती दर्शवली.
पुढे ते म्हणाले, मीच धर्मेंद्रला शोमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते. त्यानंतर शोमध्ये महत्त्वाचे बदल करण्यासही मीच त्याला सुचवले. त्यानंतर काही राजकीय कारणाने मला शो सोडावा लागला. पण या दरम्यान मला प्रेक्षकांनी खूपच मिस केले. तसेच मला अनेकदा शोमध्ये परत येण्याचीही विनंती केली गेली. द ग्रेट इंडियन कपिल शो 3 हा 31 जून पासून नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.