कपिल शर्मा शोची कमेडी क्वीन अर्चना पुरनसिंग यांच्यासोबत फसवणुकीचा प्रकार घडला आहे. अर्चनाने तिच्या व्लॉगमध्ये हा प्रकार शेयर केला आहे. अर्चना दुबईच्या ट्रीपवर असताना तिच्यासोबत फसवणुकीचा प्रकार घडला आहे. नेटफ्लिक्सवर द ग्रेट इंडियन कपिल शो मध्ये आपल्या हसण्यासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री मध्यंतरी दुबईला आपल्या कुटुंबासोंबत गेली होती.
त्यांनी याठिकाणी इनडोर स्काय डायव्हिंग सिस्टिम Ifly दुबई सफारीसाठी तिकिटे खरेदी केली.
पण या सफारीसाठी अर्चना तिथे पोहोचल्यावर तिथे अर्चना यांचे बूकिंगच झाले नसल्याचे समोर आले. ऑनलाइन बूकिंगसाठी अर्चना यांनी आधीच पैसे दिले होते. पण त्या बुकिंग लिस्टमध्ये नाव नसल्याचे पाहून त्या हैराण झाल्या.
याबाबत व्लॉगमध्ये बोलताना अर्चना म्हणतात, आम्ही आयफ्लाय दुबईमध्ये तीन स्लॉट बूक केले होते. पण तेथील महिला सांगत होती आमचे कोणतेही बूकिंग नाही. दुबईमध्ये आमच्यासोबत हा फसणवुकीचा प्रकार घडला आहे. आम्ही आधीच पैसे पे केले होते. येथील तिथे अजिबात स्वस्त नाहीत.
दुबईच्या या सफारीमध्ये आमचे पैसे जवळपास बुडल्यात जमा आहेत. मला इथे असे घडेल अशी अपेक्षा अजिबात नव्हती. तिथे इथे इतके कडक कायदे आहेत. लोक अशी फसवणूक करत असावेत याची मला अजिबात कल्पना नाही.
मी हैराण आहे. माझे हजारो रुपये असेच गायब झाले.’ यापुढे अर्चना यांचे पती परमीत म्हणतात, यानंतर आम्ही रोख पैसे देऊन तिकिटे खरेदी केली.’
अर्चना यांचा मुलगा आर्यमान सेठी म्हणतो,’ जेव्हा मी चार मिनिटांचे पॅकेज निवडले, तेव्हा साईटने त्याची वेळ 2 मिनिटे केली. मला वाटले की ही कोणती तरी तांत्रिक समस्या असू शकते. पण आता ती वेबसाईटमला सापडत नाहीये. विशेष म्हणजे या साईटवर रमजान सूटपण दिली होती. खरे पाहता रमजानचा महिना उलटून बरेच दिवस झाले आहेत.’ अर्चना सध्या नेटफ्लिक्सवरील द ग्रेट इंडियन कपिल शो' या शोमध्ये नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासोबत दिसत आहेत.