बॉलीवूडचे क्युट कपल सिद्धार्थ कियारा नुकत्याच एका गोंडस परीचे आईबाबा झाले आहे.सिद्धार्थ आणि कियाराची लवस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे.लस्ट स्टोरी या वेबसिरिजच्या रॅप अप पार्टीमध्ये या दोघांची पहिली भेट झाली होती..यानंतर हे दोघे भेटत राहिले. यांच्या ऑफ स्क्रीन केमिस्ट्रीवरुन त्यांच्या चाहत्यांनी अंदाज बांधला होताच.पण त्यांनी आपले नाते सीक्रेट ठेवणे पसंत केले.शेरशाहनंतर मात्र हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत यावर जणू शिक्कामोर्तब झाले.सिद्धार्थने कियाराला प्रपोज करताना एकदम फिल्मी स्टाइलमध्ये प्रपोज केले होते.रोममध्ये शेरशाहमधील डायलॉग दिल्ली का सीधा- साधा लौंडा हूं.. म्हणत त्याने कियाराला प्रपोज केले.7 फेब्रुवारी 2023 मध्ये या जोडीने जैसलमेर येथे लग्नगाठ बांधली.Chahal RJ Mahvash Vacation: चहल-महावशचे लंडनमध्ये सीक्रेट व्हेकेशन? फोटो आले समोर