

Arbaaz Khan Daughter Name revealed know meaning
मुंबई : अरबाज खान - शूरा खानने आपल्या बाळाचे नाव सार्वजनिक केलं आहे. शूराने ५ ऑक्तोबर रोजी मुलीला जन्म दिला होता. या कपलने आपल्या बाळाचे युनिक नाव ठेवले असून त्याचा अर्थ काय आहे, पाहुया.
अरबाज-शूराने सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून नावाचा खुलासा केला आहे. अरबाज खान - शूरा खानने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केले आहे. या पोस्टमध्ये लिहिलं, “बेबी गर्ल सिपारा खानचे स्वागत आहे. प्रेमासोबत शूरा आणि अरबाज.” या पोस्टवर सोशल मीडिया युजर्सकडून कॉमेंट्सचा पाऊस होत आहे. राशा थडानी, महीप कपूर, जन्नत जुबैर सह अनेक स्टार्सनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
रिपोर्टनुसार, सिपारा नाव उर्दू/अरबी शब्द ‘सिपारा’ पासून घेण्यात आला आहे. ज्याचा अर्थ आहे- “पवित्र कुराणातील एक भाग वा खंड.”
अरबाज-शूराच्या फॅन्सना नावाचा अर्थ खूप सुंदर वाटला. सोशल मीडियावर लोक कपलला शुभेच्छा देत आहेत. नेटकरी ‘सिपारा’ला “खान परिवाराची लिटिल एंजल” म्हणून बोलावत आहेत.
शूराशी अरबाज खानची पहिली भेट पटना शुक्लाच्या चित्रपटाच्या सेटवर जाली होती. या चित्रपटाचे निर्माता अरबाज होता. यामध्ये रवीना टंडनने काम केलं होतं. शूरा रविनाची मेकअप आर्टिस्ट होती. अरबाज आणि शूराने काही काळ एकमेकांना डेट केलं आणि यानंतर दोघांनी डिसेंबरमध्ये लग्न केले होते.