Girija Prabhu | कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेतील सीनसाठी गिरीजा उतरली चिखलात

Kay Hotis Tu Kayzalis Tu Girija Prabhu | अभिनेत्री गिरीजा प्रभूने स्वीकारलं नवं आव्हान स्वीकारलेलं आहे. सीनसाठी ती चिखलात उतरली आहे
image of actress girija prabhu
Kay Hotis Tu Kayzalis Tu Girija Prabhu water mud seen Instagram
Published on
Updated on

मुंबई : स्टार प्रवाहच्या कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. ल़ॉन्चच्या पहिल्याच आठवड्यात ६.७ टीआरपी मिळवत मालिकेची धमाकेदार सुरुवात झालीय. लवकरच मालिकेत एक रोमांचक वळण पाहायला मिळणार आहे.

image of actress girija prabhu
Anita Date Jarann film Teaser | ‘भूतकाळातून सुटका अशक्य आहे’, ‘जारण’ चा चित्तथरारक टीझर भेटीला

कावेरी आणि उदयच्या अपघातानंतर चिमुकल्या चिकूला घेऊन कावेरी धर्माधिकारींच्या घरी येते. मात्र सुलक्षणा तिचा स्वीकार करत नाही. घरात स्थान हवं असेल तर मंदिराजवळ असलेल्या तलावातून कमळ आणण्यासाठी तिला सांगण्यात येतं. त्या तलावात उतरणं म्हणजे साक्षात मृत्यूला कवटाळण्यासमान आहे. मात्र कावेरी हे आव्हान स्वीकारते आणि तलावत उतरते. कावेरीचा जीव वाचणार का हे मालिकेच्या पुढील भागांमधून कळेल.

अभिनेत्री गिरीजा प्रभूसाठी हा सीन साकारणं आव्हानात्मक होतं. साडी नेसून तलावात उतरणं म्हणजे तारेवरची कसरत. बॉडी डबल न वापरता गिरीजाने हा सीन पूर्ण केला आहे. कुडाळ येथील वालावल मंदिराजवळच्या तलावात हा सीन शूट करण्यात आला आहे. दलदल आणि कमळांचं पसरलेलं जाळं यामध्ये शूट करणं जोखमीचं होतं. मात्र मालिकेच्या संपूर्ण टीमच्या मदतीने गिरीजाने यशस्वीरित्या हा सीन पूर्ण केला. जवळपास तीन तास या सीनचं शूट सुरु होतं. संपूर्ण टीमच्या मेहनतीचं हे फळ आहे, असं अभिनेत्री गिरीजा म्हणाली. कोण होतीस तू, काय झालीस तू रात्री ८ वाजता स्टार प्रवाहवर पाहा.

image of actress girija prabhu
Shekhar Suman | ११ वर्षाच्या मुलाच्या मृत्यूनंतर तुटले होते शेखर सुमन; हटवल्या होत्या धार्मिक मूर्ती, मंदिरही बंद करून टाकलं

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news