अप्पी आमची कलेक्टर : अप्पीच्या डोहाळे जेवणात येणार विघ्न!

अप्पी आमची कलेक्टर
अप्पी आमची कलेक्टर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेचा १७ डिसेंबरच्या महाएपिसोडमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे अप्पीचे डोहाळे जेवण. या डोहाळे जेवणानिमित्त घरातली सगळी मंडळी खूप आनंदात आहेत. पण स्वप्निल रूपालीसोबत घरीच थांबायचे ठरवतो.

संबंधित बातम्या 

इकडे सरकारला सुजय किंवा मनी त्यांचं सिक्रेट अर्जुनला सांगतील यांची भीती असल्याने सरकार अप्पीला त्यांचं सिक्रेट सांगतो. सरकारांचे हे गुपित ऐकून अप्पीला धक्का बसणार आहे. पण डोहाळे जेवण असल्यामुळे ती इतरांसमोर आनंदी राहण्याचा प्रयत्न करतेय. दुसरीकडे मनी जाणूनबुजून रूपालीला अप्पीचं डोहाळे जेवण होतंय आणि घरातल्या लोकांना तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही असे बोलून भडकावते.

आधीच दुःखातून जात असलेली रुपाली मानसिक अपघातावरून या बोलण्याने अजूनच त्रासते. रुपाली अप्पीच्या डोहाळे जेवणात काही विघ्न आणणार का? हे 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत पाहण्यासाठी चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news