Disha Salian death case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी ‘एसआयटी’ चौकशीचे आदेश | पुढारी

Disha Salian death case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी 'एसआयटी' चौकशीचे आदेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी आज ( दि. १२) विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात येणार आहे. सुशांत रजपूत याच्या संशयास्पद मृत्यूच्या काही दिवस आधी ८ जून २०२० रोजी मुंबईतील मालाड भागातील एका उंच इमारतीवरून सालियनने उडी मारून जीवन संपवले होते. Disha Salian death case

दीशाच्या मृत्यूप्रकरणी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मुंबई पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत. त्यानंतर मुंबईच्या उत्तर विभागाचे अतिरिक्त आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीची स्थापना करण्यात येणार आहे. Disha Salian death case

यापूर्वी शिंदे गटातील अनेक आमदारांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. दिशा सालियन मृत्यू प्रकरण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने दडपल्याचा आरोपही भाजपने केला होता.

दरम्यान, सालियनच्या पालकांनी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून केंद्रीय मंत्री नारायण राणे, त्यांचा आमदार मुलगा नितेश राणे आणि इतरांवर त्यांच्या मुलीच्या मृत्यू बद्दल खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल आणि कुटुंबाची बदनामी केल्याबद्दल कारवाई करण्याची मागणी केली होती.

दिशाचे वडील आणि आई सतीश सालियन आणि वासंती सालियन यांनीही त्यांना न्याय न मिळाल्यास जीवन संपवण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नसल्याचे सांगितले होते. त्यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूबद्दल बदनामीकारक मजकूर सर्व मीडिया प्लॅटफॉर्मवरून काढून टाकावा, अशी मागणी केली होती.

Disha Salian death case : ये डर अच्छा है, : आदित्य ठाकरे

दिशा सालियन प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचे राज्य सरकारने दिलेले संकेत आणि त्यांच्या चौकशीबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ठाकरे गटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकार हे सगळे घाबरूनच करत आहे. ज्या नेत्याची त्यांना भीती वाटते त्याची प्रतिमा खराब करणे, ही भाजपची रणनीती आहे. भाजप भीतीपोटी या सर्व गोष्टींचा कट रचत आहे. खोटे आरोप, भ्रष्टाचाराचे आरोप लावून विरोधी पक्षनेत्यांची प्रतिमा खराब करणे, ही भाजपची रणनीती आहे, ये डर अच्छा है, अशी प्रतिक्रिया ठाकरे यांनी दिली होती.

हेही वाचा 

Back to top button