Appi Aamchi Collector | अप्पी- अर्जुन पुन्हा एकत्र येऊ शकतील?

'अप्पी आमची कलेक्टर' : अप्पी-अर्जुन मध्ये पुन्हा दुरावा निर्माण होणार का?
Appi Aamchi Collector tv serial updates
अप्पी आमची कलेक्टर मालिकेत नवं ट्विस्ट येणार Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत अमोल आपल्या आई-बाबांना एकत्र आण्यासाठी जीवापाड मेहनत घेत आहे. अमोल रोज काहीतरी रेखाटत असल्याचं सगळ्यांच्या लक्षात येतं. जेव्हा दिप्या त्याला सतत प्रश्न विचारतो तेव्हा हे स्पष्ट होते की, अमोल त्याच्या वाढदिवसाची चित्रे काढत आहे. पहिला, दुसरा आणि तिसरा वाढदिवस!

Appi Aamchi Collector tv serial updates
'नवरी मिळे हिटलरला' : एजे- लीलाच्या रिसेप्शन मध्ये काय घडले?

दरम्यान, अप्पी आणि अर्जुन यांच्यातील जवळीक हळूहळू वाढत आहे, तेव्हा रुपाली आर्याला सांगते की, अप्पी आणि अर्जुनमधील सर्वात मोठी लढाई फक्त एकाच गोष्टीवर असू शकते ती म्हणजे तत्त्वांवर! तिने अर्जुनच्या भ्रष्टाचाराचा उल्लेख केला आणि रुपाली आणि आर्याने याचा वापर करून दोघांमध्ये तेढ निर्माण करण्याचा निर्णय घेतला. इकडे अमोल त्याचे रेखाचित्र पूर्ण करतो आणि अप्पी आणि अर्जुनला दाखवतो.

Appi Aamchi Collector tv serial updates
IFFM 2024 | अपारशक्ती खुराणा स्टारर 'बर्लिन' चा IIFM 2024 मध्ये होणार प्रीमियर

गेल्या सात वर्षांत त्यांनी काय गमावले हे दोघांच्या लक्षात येतं. अप्पी आणि अर्जुन दोघांचेही डोळे पाणावतात. अर्जुन पहिल्यांदा कबूल करतो की, त्याला अप्पीवर खूप राग आला होता, पण कुठेतरी तो तिची काळजीही करत होता. तो नेहमी अप्पी आणि अमोलसाठी प्रार्थना करायचा. अप्पीला असे वाटतं की आता सगळं संपलं आहे. अर्जुन आर्याशी बोलण्याचा निर्णय घेतो. घरातले सगळे हा क्षण साजरा करायचं ठरवतात. त्याचवेळी, रात्री त्या दोघांसाठी सरप्राईज प्लॅन करत असताना, एक माणूस येतो आणि अर्जुनवर पुरावे सादर करत भ्रष्टाचाराचा आरोप करतो. या आरोपांमुळे अप्पी-अर्जुन मध्ये पुन्हा दुरावा निर्माण होणार का? आर्याचा हा प्लान यशस्वी होईल का? हे पाहण्यासाठी 'अप्पी आमची कलेक्टर' रोज संध्या ७:०० वा. झी मराठीवर पाहा.

Appi Aamchi Collector tv serial updates
Gharoghari Matichya Chuli | पार पडणार ऋषिकेश-जानकीचा विवाह सोहळा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news