Kavya Maran Wedding: अनिरुद्ध आणि काव्या मारन लग्नबंधनात अडकणार; रिसेप्शनची तारीख समोर, मुख्यमंत्र्यांच्या पोस्टने चर्चांना उधाण

Anirudh Ravichander Kavya Maran Wedding: अनिरुद्ध रविचंदर आणि सनरायझर्स हैदराबादच्या सीईओ काव्या मारन यांच्या लग्नाबाबतच्या चर्चांना आता दुजोरा मिळाला आहे.
Anirudh Ravichander Kavya Maran Wedding
Anirudh Ravichander Kavya Maran WeddingPudhari
Published on: 
Updated on: 

Anirudh Ravichander Kavya Maran Wedding: दक्षिण भारतीय लोकप्रिय संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि सनरायझर्स हैदराबाद संघाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी काव्या मारन यांच्या लग्नाबाबत गेल्या काही काळापासून चर्चा सुरू होत्या. मात्र आता त्यांचे लग्न ठरल्याची माहिती समोर आली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी सोशल मीडियावर यासंदर्भातील माहिती शेअर केली आहे. या जोडप्याच्या लग्नाचे रिसेप्शन २१ नोव्हेंबर रोजी चेन्नई येथे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांना दिले रिसेप्शनचे निमंत्रण

तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये सन ग्रुपचे अध्यक्ष कलानिथी मारन आणि त्यांच्या पत्नी कावेरी मारन हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेल्याचे दिसते. या भेटीदरम्यान त्यांनी आपली मुलगी काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंदर यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांना दिले.

रेवंत रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे रिसेप्शन २१ नोव्हेंबर रोजी चेन्नई येथे आयोजित करण्यात येणार आहे. या माहितीनंतर अनिरुद्ध आणि काव्या यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

२०२५ पासून सुरू होती दोघांच्या नात्याची चर्चा

अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारन यांच्या नात्याबाबत २०२५ मध्ये चर्चा सुरू झाली होती. त्यावेळी सोशल मीडियावरील एका रेडिट पोस्टमध्ये दोघे एकमेकांना डेट करत असल्याचा आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये लग्नाबाबत चर्चा सुरू असल्याचा दावा करण्यात आला होता.

मात्र, त्यावेळी अनिरुद्धने या चर्चांचे खंडन केले होते. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत लग्नाच्या बातम्यांवर आश्चर्य व्यक्त केले होते. तसेच, अफवा पसरवू नका, असे आवाहनही त्याने चाहत्यांना केले होते.

अनिरुद्धने या चर्चांना नकार दिल्यानंतरही त्याच्या आणि काव्या यांच्या नात्याबाबत वेगवेगळे दावे समोर येत राहिले. आता रिसेप्शनच्या निमंत्रणासंदर्भातील माहिती समोर आल्यानंतर या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

Anirudh Ravichander Kavya Maran Wedding
Delhi-Mumbai Expressway Accident: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; बस दरीत कोसळली, आठ जणांचा जागीच मृत्यू

अनिरुद्धच्या काकांनीही दिले होते लग्नाचे संकेत

जून २०२६ मध्ये अनिरुद्धचे काका आणि अभिनेते वाय. जी. महेंद्र यांनीही एका मुलाखतीदरम्यान त्याच्या लग्नाबाबत भाष्य केले होते. अनिरुद्ध लग्नासाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यांच्याकडे असलेल्या माहितीनुसार, हे लग्न निश्चित असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

काव्या मारन यांच्या कामाचे कौतुक करताना महेंद्र यांनी त्या सनरायझर्स हैदराबादसारख्या मोठ्या क्रिकेट संघाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत असल्याचे सांगितले होते. काव्या यांनी वडिलांकडून व्यवसायाचे गुण घेतले आहेत, असेही ते म्हणाले होते. अनिरुद्ध आणि काव्या ही जोडी एकमेकांसाठी योग्य असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले होते.

Anirudh Ravichander Kavya Maran Wedding
Gold Silver Price Today: सोनं 4,500 रुपये तर चांदी सुमारे 13,500 रुपयांनी स्वस्त; काय आहे आजचा भाव?

कोण आहेत अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारन?

अनिरुद्ध रविचंदर हा दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय संगीतकार आणि गायक आहे. त्याने तमिळ चित्रपटांसह इतर भाषांमधील चित्रपटांसाठीही संगीत दिले आहे. त्याची गाणी तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत.

दुसरीकडे, काव्या मारन या प्रसिद्ध उद्योगपती कलानिथी मारन यांच्या कन्या आहेत. त्या सनरायझर्स हैदराबाद या आयपीएल संघाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतात. आयपीएल सामन्यांदरम्यान मैदानावर उपस्थिती आणि संघाशी संबंधित घडामोडींमुळेही त्या चर्चेत असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news