

Anil Kapoor Statement: प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूरच्या सुभेदार चित्रपटाचा ट्रेलर नुकतेच रिलीज झाला आहे. हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर येणार आहे. अनिल कपूर यामध्ये अॅक्शन करताना दिसणार आहे. सुरेष त्रिवेणी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट येत्या ५ मार्च रोजी जगभारत स्ट्रीम होणार आहे. दरम्यान ट्रेलर लाँचवेळी अनिल कपूरनं माध्यामांशी दिलखुलास गप्पा मारल्या. तसेच आपल्या कारकिर्दीविषयी देखील भाष्य केलं.
ट्रेलर रिलीजवेळी अनिल कपूरला त्याच्या जुन्या अभिनेत्रींबाबत प्रश्न विचारण्यात आला. आता त्या अभिनेत्रींसोबत त्यांचे नातं कसं आहे असं विचारण्यात आलं त्यावेळी त्यांनी गंमतीनं आजकाल कोणती अभिनेत्री माझ्यासोबत काम करण्यात तयार होत नाही. सर्वांना युवा कलाकारांसोबत काम करतायचं आहे. ज्या वरिष्ठ अभिनेत्री आहेत त्या देखील माझ्यासोबत काम करण्यात तयार नाहीत. तुम्हीच माझी जरा शिफारस करा असं म्हणाला.
पत्रकारांसोबत बोलताना अनिल कपूरने तो दिग्दर्शकांसोबत कसं बोलतो हे सांगितलं. तो म्हणाला, इंद्रा कुमार यांच्यासोबत तो कसा बोलतो हे देखील सांगितलं. अनिल गंमतीत म्हणाला की, अरे इंदू तुझ्या धमाल ४ चं काय झालं. तू मला घेतलं नाहीस त्या चित्रपटात चल ठीक आहे काही अडचण नाही. अजयने तुला नको म्हणून सांगितलं का?
अनिल कपूरच्या या वक्तव्यानंतर चाहते हसून हसूल लोटपोट झाले. अनिल कपूरच्या अभिनयाचे आणि त्याच्या चिरतरूण लुक्सचे लोकं चाहते आहेत. सध्या अनिल कपूरचा हा गंमत केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सुभेदारच्या ट्रेलरबाबत बोलायचं झालं तर, हा ट्रेलर भारतातील काही डार्क ठिकाणी घेऊन जातो. जिथं अवैध वाळू उपसा, भीती या वातावरणाचा फील देतो. अनिल कपूर हा निवृत्त सुभेदार अर्जुन मौर्या या भूमिकेत दिसणार आहे. तो एक कडक शिस्तीचा, युद्ध पाहिलेला आणि वैयक्तिक आयुष्यात खूप वेदना पाहिलेल्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे.
अनिल कपूर आणि राधिका मदान यांच्यासोबत या चित्रपटात मोना सिंह. सौरभ शुक्ला, आदित्य रावल, फैसल मलिक आणि खुशबू सुंदर महत्वाच्या भूमिकेत आहेत.