The Night Manager 2 : अभिनेता अनिल कपूरचा दमदार परफॉर्मन्स

anil kapoor
anil kapoor

पुढारी ऑनलाईन डेस्क : "द नाईट मॅनेजर" या बहुचर्चित वेब सीरिजचा दुसरा भाग येताच त्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या आहेत. या वेब सीरिजमध्ये एका भूमिकेचं विशेष कौतुक ते म्हणजे अभिनेता अनिल कपूर या अभिनेत्याने त्याच्या जबबरदस्त अभिनयाने पुन्हा प्रेक्षकांची मने जिंकली. शेली रुंगटा हे अनोखं पात्र साकारलं. (The Night Manager 2) "द नाईट मॅनेजर -२" मध्ये अनिल च्या कामाचं सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळतंय. (The Night Manager 2)

पहिल्याच फ्रेमपासून अनिल कपूर याचा अभिनय प्रेक्षकांना खिळवून ठेवतो त्याचं व्यक्तिमत्व अभिनयाची अनोखी शैली प्रत्येक फ्रेममध्ये दिसते. तो खऱ्या अर्थाने अष्टपैलुत्व अभिनेता म्हणून स्वतःच वेगळं स्थान निर्माण करतो.

द नाईट मॅनेजरच्या पहिल्या सीझनमध्ये अनिल कपूरची अफाट प्रतिभा दाखवली होती तर दुसऱ्या सीझनमध्ये अनिल या शोचा खरा स्टार म्हणून बघायला मिळतोय. समीक्षक आणि चाहत्यांनी या कामाचं आजपर्यंतची त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी म्हणून असं कौतुक केलं.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news