Anger Control : छोट्या-छोट्या गोष्टींवर लगेच राग येतो? 'या' उपायांनी स्वतःवर ठेवा कंट्रोल!

थेरपिस्टने सांगितलेले हे ५ उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
Anger Control
Anger Control : छोट्या-छोट्या गोष्टींवर लगेच राग येतो? 'या' उपायांनी स्वतःवर ठेवा कंट्रोल!File Photo
Published on
Updated on

lifestyle 5 simple ways to stop getting angry over little things

पुढारी ऑनलाईन : छोट्याशा गोष्टीवर राग येणे आणि नंतर त्याचा पश्चात्ताप होणे ही अनेकांसोबत घडणारी गोष्ट आहे. जर तुम्हालाही छोट्या-छोट्या गोष्टींवर पटकन राग येत असेल, तर थेरपिस्टने सांगितलेले हे ५ उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

Anger Control
Expensive Venom : साप नाही... घराजवळ आढळणाऱ्या 'या' जीवाचे विष जास्त धोकादायक! किंमतही कोटीत

कधी कोणी तुमचे म्हणणे ऐकले नाही, कोणी रस्त्यात तुमच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला किंवा घरातील एखाद्या छोट्याशा कारणावरून वाद झाला आणि तुमचा राग लगेच सातव्या आसमानावर पोहोचला. नंतर मन शांत झाल्यावर वाटते की, एवढ्याशा गोष्टीवर इतका राग करण्याची गरजच नव्हती. तुमच्यासोबतही असे होत असेल तर तुम्ही एकटे नाही. अनेकदा गोष्ट छोटी आहे हे माहीत असूनही त्या क्षणी रागावर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. थेरपिस्ट जेफरी मेल्टजर यांनी अशा परिस्थितीत ५ सोपे उपाय सांगितले आहेत.

चेहऱ्यावर थंड पाणी शिंपडा

जेव्हा तुम्हाला जाणवेल की राग खूप वाढत आहे, तेव्हा लगेच वाद घालण्याऐवजी काही वेळ त्या परिस्थितीपासून दूर व्हा. चेहऱ्यावर थंड पाणी शिंपडा किंवा काही वेळ एखादी थंड वस्तू चेहऱ्याजवळ ठेवा. थेरपिस्टच्या मते, चेहरा थंड केल्याने शरीर शांत होण्यास मदत होऊ शकते आणि हृदयाची धडधडही काही प्रमाणात कमी होऊ शकते. त्यामुळे पुढच्या वेळी खूप राग आल्यास आधी चेहरा थंड करा आणि मगच बोला.

Anger Control
Bollywood : “तुम्ही तुमच्या भावाला बिकिनीमध्ये राखी बांधता का?” कंगना रनौत क्रिती सेनॉनवर का संतापल्या

प्रत्येक गोष्टीचा वाईट अर्थ काढू नका

अनेकदा समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यापेक्षा आपल्या विचारांमुळे राग अधिक वाढतो. आपल्याला वाटते की, समोरच्या व्यक्तीने मुद्दाम असे केले किंवा त्याला आपला आदर नाही. मात्र, लगेच असा निष्कर्ष काढण्याऐवजी स्वतःला विचारा की यामागे दुसरे काही कारण असू शकते का? कदाचित समोरच्या व्यक्तीने तुम्हाला पाहिले नसेल किंवा तिच्याकडून चूक झाली असेल. प्रत्येक गोष्ट मुद्दाम केली आहे असे मानल्याने राग आणखी वाढू शकतो.

राग मनात कायम ठेवू नका

एखाद्या गोष्टीमुळे राग आला असेल तर ५ ते १० मिनिटे त्याबद्दल विचार करा. तुम्हाला त्रास देणारी गोष्ट कागदावर लिहून काढू शकता. मात्र, त्यानंतर जाणीवपूर्वक तुमचे लक्ष दुसऱ्या गोष्टीकडे वळवा. एकाच गोष्टीचा वारंवार विचार करत राहिल्याने राग कमी होण्याऐवजी आणखी वाढू शकतो. त्यामुळे रागाबद्दल विचार करण्यासाठी थोडा वेळ द्या; पण तो संपूर्ण दिवस मनात घेऊन फिरू नका.

दीर्घ श्वास घ्या

रागाच्या भरात लगेच प्रतिक्रिया देणे नंतर त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे साधारण एक मिनिट थांबा आणि हळूहळू दीर्घ श्वास घ्या. आधी शरीराला शांत करा आणि त्यानंतर तुम्हाला नेमके काय बोलायचे किंवा करायचे आहे, याचा विचार करा. अनेकदा फक्त एका मिनिटाचा ब्रेक घेतल्याने नंतर पश्चात्ताप होईल अशी प्रतिक्रिया देण्यापासून आपण स्वतःला रोखू शकतो.

झोप आणि आरामाकडे दुर्लक्ष करू नका

जेव्हा शरीर खूप थकलेले असते, तेव्हा अगदी छोटी गोष्टही मोठी वाटू शकते. पुरेशी झोप न झाल्याने चिडचिडेपणा आणि राग वाढू शकतो. त्यामुळे दररोज पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा. थोडे चालणे, काही वेळ उन्हात राहणे आणि शरीराला पुरेशी विश्रांती देणेही महत्त्वाचे आहे. जेव्हा शरीर आणि मन थकलेले नसते, तेव्हा छोट्या-छोट्या त्रासदायक गोष्टी हाताळणेही सोपे जाते.

राग येणे चुकीचे नाही, पण प्रतिक्रिया महत्त्वाची!

राग येणे ही स्वाभाविक भावना आहे; मात्र रागाच्या भरात आपण काय करतो, हे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे पुढच्या वेळी छोट्याशा गोष्टीवर राग आला तर लगेच बोलण्याऐवजी थोडे थांबा, दीर्घ श्वास घ्या आणि आधी स्वतःला शांत करा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news