

बिग बी अमिताभ बच्चन सोशल मिडियावर अत्यंत उत्साहाने अॅक्टिव असतात. वेगवेगळ्या पोस्ट करून ते चाहत्यांना कधीही नाराज करत नाहीत. यामध्ये कधी अभिषेकचे कौतुक करणारी पोस्ट असते. तर कधी ईश्वराची प्रार्थना असते. तर एखाद्या गोष्टीवर खोचक अशी टिप्पणी असते. आताही बिग बीनी अशी पोस्ट केली की नेटीझन्सनी नेहमीप्रमाणे कमेंट्सचा पाऊस पाडत धमाल उडवून दिली. (Latest Entertainment News)
अमिताभ यांची ही पोस्ट मराठी शिकण्याबाबत होती. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, ‘FB 4415 - कोणीतरी मला सांगितले की तुला मराठी येत नाही आणि तू इतक्या वर्षांपासून मुंबईत राहतोस. हे खरे आहे, पण ते शिकण्याचा प्रयत्न कर, हे शिकणे देखील एक सलाम आहे.
अर्थात या पोस्टवर नेटीझन्सनी देखील भन्नाट कमेंट केल्या आहेत. सध्या महाराष्ट्रात मराठीच्या मुद्दा वादात असताना या पोस्टवर कमेंट करताना एकजण म्हणतो, सर आजकल तो रिवाज बन गया है भाषा के नाम पर अत्याचार करना! आप वैसे ही रहिये जैसे है! जिसे जो भाषा सीखनी है अपनी खुशी से सीखे ना की ज़ोर जबरदस्ती से आप हिमाचल आइए कोई आपसे पहाड़ी में बात करने के लिए नहीं कहेगा!
तर एका महिला युजरने त्यांच्या प्रयत्नाचे कौतुक केले आहे. ती म्हणते, खूप छान... जमेल तुम्हाला. आज पहिल्यांदा तुमच्या पोस्टला लाईक कमेंट करायची इच्छा झाली.
तर एकाने थेट जया बच्चन यांचा उल्लेख केला आहे तो म्हणतो, ‘ तात्या तुम्ही जया आत्याला शिकवणीला घ्या मंग तुमचा स्पीड बघा.
तर एकीने मराठी सिनेमा करण्यासाठी मराठी शिकावी लागेल असे म्हणले आहे. ‘ नमस्कार सरआप तो स्वयं हिन्दी , अंग्रेजी साहित्य पर अच्छी पकड़ रखते हैं तो मुझे नहीं लगता है कि जबरदस्ती किसी भाषा को सीखी जाए हाँ किसी भी भाषा को तब सीखनी चाहिए जहाँ पर communication के लिए आवश्यक हो जाए। इतने बर्षो से आप मुंबई में हैं तो क्या आपकी भाषा को लोगों ने नहीं समझा! हाँ अगर मराठी फिल्म करने वाले हैं तो फिर मराठी सीखनी पड़ेगी!मूक बधिर जो नहीं बोल पाते उनकी भाषा अलग होती है तो क्या आम लोगों को उनकी सीखनी पड़ेगी ? नही! हम असे communicate कर लेते हैं। मनुष्य की तो बस एक ही भाषा है वो है प्रेम की !
एका पोस्टमध्ये अमिताभ यांनी 'लालबाग च राजा' असे कॅप्शन लिहिले. यातील चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी ती दुरुस्त करणारी दुसरी पोस्ट लिहिली. यात ते म्हणतात, हमारे एक शुभचिंतक ने कहा, की हमनें कल के ट्वीट में ग़लत शब्द लिख दिया है , तो उसे सही कर रहा हूँ । मैंने लिखा था 'लालबाग 'च' राजा ' उन्होंने कहा होना चाहिए 'चा ' सो सही कर रहा हूँ। लालबाग चा राजा
क्षमा प्रार्थी.
यावर अनेकांनी अमिताभ यांना आता मराठी शिकाची कमेंट केली होती.