Amitabh bachchan: सुनेचे जाहीर कौतुक का करत नाही? या प्रश्नावर बिग बी अमिताभ यांचे खरमरीत उत्तर
बिग बी अमिताभ बच्चन सोशल मिडियावर कमालीचे अॅक्टिव असतात. अनेकदा ते विनोदी तर कधी गंभीर पोस्ट करतात. विशेष म्हणजे जुनीयर बच्चन अभिषेकच्या कामाबाबत पोस्ट करताना मात्र ते हात अजिबात आखडता घेत नाहीत. अलीकडेच त्यांनी अभिषेकचे कौतुक केले होते. तेव्हा एका युजरने विचारले की तुम्ही पत्नी जया आणि सून ऐश्वऱ्याचे असे कौतुक का करत नाही.
रविवारी नेहमीप्रमाणे आपल्या चाहत्यांच्या भेटीचा फोटो सोशल मिडियावर शेयर केला. या पोस्टच्या कॅप्शन मध्ये ते म्हणतात, 'हो, मी अभिषेकचे कौतुक करतो, मग?’
या पोस्टवर नेहमीप्रमाणे कमेंट्सचा पाऊस पडला. एका युजरने कमेंट केली की, 'तर तुम्ही तुमच्या मुलगी, पत्नी आणि सुनेचे पण असेच कौतुक करायला हवे.’ यावर बिग बी यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणतात, ‘ हो मी त्यांचे मनापासून कौतुक करेन. पण सार्वजनिक पद्धतीने नाही. महिलांच्या प्रती सन्मान.’
यावर गप्प बसतील तर ते ट्रोलर कसले? एका युजरने कमेंट केली की 'पेड फॅन्स.’ यावर बिग बी उत्तर देतात, ‘ सिद्ध करा! तुमचे विचार लहान आहेत. तुम्ही पैसे देऊन स्वतचे फॅन्स का आणत नाही.’
अमिताभ आगामी कल्की 2898 च्या सिक्वेलमध्ये दिसणार आहेत. याशिवाय ते सेक्शन 84 या सिनेमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येतील.
