Bomb Threat Email : मुंबईला पुन्हा बॉम्बस्फोटांनी हादरवण्याची धमकी! ई-मेलमध्ये अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासह महापौर कार्यालयाचा उल्लेख

मुंबईला पुन्हा एकदा बॉम्बस्फोटांनी हादरवण्याची धमकी देणारा ई-मेल आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
Bomb Threat Email
Bomb Threat Email : मुंबईला पुन्हा बॉम्बस्फोटांनी हादरवण्याची धमकी! ई-मेलमध्ये अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासह महापौर कार्यालयाचा उल्लेखfile photo
Published on: 
Updated on: 

threat email warning of bomb blasts in mumbai bmc mayor amitabh bachhan

पुढारी ऑनलाईन : मुंबईला पुन्हा एकदा बॉम्बस्फोटांनी हादरवण्याची धमकी देणारा ई-मेल आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या धमकीच्या ई-मेलमध्ये बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा बंगला, मुंबईच्या महापौरांचे कार्यालय, शहरातील अनेक बँका आणि न्यायालयांना लक्ष्य करण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि महालक्ष्मी रेसकोर्सचाही उल्लेख आहे. या धमकीनंतर मुंबई महापालिका मुख्यालयातील (BMC) सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

Bomb Threat Email
Sonia Gandhi : सोनिया गांधी यांच्या जीवनावर तेलुगू चित्रपट बनणार; आत्मचरित्र ‘बिलाँगिंग’वर आधारित असेल कथा, काँग्रेस नेत्याची घोषणा

धमकीची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, बॉम्बशोधक व नाशक पथक आणि श्वान पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी महापौर कार्यालयासह मुंबई महापालिका मुख्यालयाच्या कानाकोपऱ्याची कसून तपासणी केली. तसेच ई-मेलमध्ये उल्लेख करण्यात आलेल्या अन्य ठिकाणांचीही सुरक्षा वाढवण्यात आली असून, तेथे सखोल तपासणी मोहीम राबवण्यात आली.

अनेक तास चाललेल्या तपासणीनंतर सुरक्षा यंत्रणांना दिलासा मिळाला आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ई-मेलमध्ये नमूद करण्यात आलेल्या सर्व ठिकाणांची तपासणी पूर्ण झाली असून, कुठेही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक सामग्री आढळलेली नाही.

Bomb Threat Email
kaali kheti : शेतांमध्ये दडलंय मृत्यूचं रहस्य! जॅकी श्रॉफ, शरद केळकर यांच्या ‘काली खेती’चा थरारक ट्रेलर पाहांच..

या ई-मेलमध्ये खलिस्तान समर्थक संदर्भ आणि चिथावणीखोर संदेशांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हा ई-मेल नेमका कुठून पाठवण्यात आला आणि त्यामागे कोणाचा हात आहे, याचा तपास सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार, दहशत पसरवण्याच्या उद्देशाने एखाद्या खोडसाळ व्यक्तीने हा ई-मेल पाठवला असावा.

दरम्यान, मुंबई पोलीस आणि सायबर सेलच्या पथकांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.