Mohan Joshi Deool Band-2 | ‘तुम्हालाच पाहायचंय स्वामी समर्थांच्या भूमिकेत!, अखेर कशाप्रकारे मोहन जोशींनी वर्षांनंतर दिला प्रवीण तरडेंना होकार

लोकांना ‘स्वामी समर्थां’च्या भूमिकेत तुम्हालाच पाहायचाय, अखेर मोहन जोशी यांनी एक ‍वर्षांनंतर स्वीकारलं काम
Mohan Joshi pravin tarde
Mohan Joshi Deool Band-2 story pudhari photo
Published on
Updated on
Summary

‘देऊळ बंद २’ चित्रपटात आता मोठा ट्विस्ट समोर आला आहे. प्रेक्षकांच्या मागणीनंतर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी अखेर स्वामी समर्थांच्या भूमिकेसाठी होकार दिला. त्यानंतर शूटिंग केले. वर्ष उलटल्यानंतर त्यांनी चित्रपटात काम करण्याबाबतचा आपला निर्णय निश्चित केला. परिस्थिती अशी झाली होती की, मोहन जोशींनी या भूमिकेसाठी नकार दिला होता. वाचा शेवटपर्यंत..

Mohan Joshi Deool Band-2 story

मराठी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा चर्चेत आलेला चित्रपट म्हणजे ‘देऊळ बंद २’. प्रवीण विठ्ठल तरडे लिखित आणि दिग्दर्शित या बहुप्रतीक्षित चित्रपटामुळे सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. विशेषतः ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील चर्चित आणि भावनिक विषयांवर आधारित असलेल्या ‘देऊळ बंद’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागात देखील अभिनेते मोहन जोशी यांच्या महत्त्वाच्या भूमिकेची मोठी चर्चा सुरु आहे.

चित्रपट देऊळ बंदच्या पहिल्या भागात स्वामी समर्थांच्या भूमिकेत हरहुन्नरी अभिनेते मोहन जोशी यांनी उत्तम पद्धतीने आपली भूमिका पार पाडली. याच चित्रपटाचा दुसरा भाग येण्यासाठी दोन दिवस बाकी आहेत. चित्रपटाची कास्ट निवडताना स्वामी समर्थांची भूमिका कोण साकारणार, हा प्रश्न उभा ठाकला असताना मोहन जोशी यांना पुन्हा विचारणा झाली. पण, त्यांनी असमर्थता दर्शवली होती.

Mohan Joshi pravin tarde
Deool band- 2 | “देवाची परीक्षा” संकल्पनेवरून ‘देऊळ बंद २’ पुन्हा चर्चेत; प्रवीण तरडे पुन्हा लक्षवेधी भूमिकेत?

मोहन जोशींनी नेमकी कशी भूमिका स्वीकारली?

'देऊळ बंद २'साठी स्वामी समर्थांची भूमिका मोहन जोशींनीच साकारावी, असे प्रविण तरडेंना वाटत होते. त्यांनी त्यांच्याकडे विचारणा देखील केली. मोहन जोशी यांनी पॅरालिसिस झाला होता, त्यामुळे ही भूमिका साकारण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली. एका मुलाखतीत प्रविण तरडेंनी याबाबत सांगितले की, खूप अपेक्षा घेऊन त्यांनी जोशींना भूमिकेसाठी विचारले होते.

प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद'चा सीक्वल 'देऊळ बंद २' २१ मे ला भेटीला येणार आहे. पहिल्या ‘देऊळ बंद’ चित्रपटातही त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता सिक्वेलमध्ये त्यांच्या पात्राची कथा अधिक प्रभावी आणि सामाजिक संदर्भांनी भरलेली असल्याचे स्पष्ट होते.

चित्रपटाची कथा शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न, आत्महत्या, आर्थिक अडचणी आणि ग्रामीण भागातील सामाजिक वास्तव यावर आधारित आहे. श्रद्धा आणि विज्ञान यामधील संघर्ष या पार्श्वभूमीवर कथानक पुढे जाते. अशा गंभीर विषयांच्या पार्श्वभूमीवर मोहन जोशी यांची भूमिका कथेला आणखी ऊर्झा देणारी ठरेल, असे म्हणावयास हरकत नाही.

चित्रपटाची कथा शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न, शेतकऱ्यांचे जीवन संपव, आर्थिक अडचणी आणि ग्रामीण भागातील सामाजिक वास्तव यावर आधारित आहे. श्रद्धा आणि विज्ञान यामधील संघर्ष या पार्श्वभूमीवर कथानक पुढे जाते. अशा गंभीर विषयांच्या पार्श्वभूमीवर मोहन जोशी यांची भूमिका कथेला आध्यात्मिक आणि भावनिक खोली देणारी ठरत असल्याचे दिसते.

Mohan Joshi pravin tarde
Deool band- 2 | “देवाची परीक्षा” संकल्पनेवरून ‘देऊळ बंद २’ पुन्हा चर्चेत; प्रवीण तरडे पुन्हा लक्षवेधी भूमिकेत?

मोहन जोशी यांच्याबद्दल काय म्हणाले प्रविण तरडे?

प्रवीण तरडे म्हणाले, 'मोहन जोशी आजारी होते. म्हणून त्यांनी सांगितलं की, ते हे भूमिका करू शकत नाहीत. धक्कादायक म्हणजे, मी अभिनय बंद केलाय असं समज.' ''मी त्यांना विचारलं- तुम्ही सांगा की मी किती वर्ष थांबू. कारण, स्वामी समर्थांच्या भूमिकेत तुमच्याशिवाय लोक आता कुणालाच बघू शकणार नाहीत. मला तुम्हालाच स्वामी समर्थांच्या भूमिकेत पाहायचंय.''

ते म्हणाले, मला थोडा वेळ दे. त्यांना पॅरालिसीस झाला होता. त्यांना बोलता येत नव्हतं. त्यांना चालताही येत नव्हतं. दोनच पावले चालतील, इतकीच ताकद होती.

सरावाने सर्व घडलं..

तरडे यांनी सांगितलं की, मोहन जोशी यांनी दीड वर्ष सातत्याने प्रयत्न केले. तोंडात पेन्सिल ठेवून त्यांनी बोलण्याचा सराव केला. प्रयत्नांती ते बोलू लागले, चालू लागले". सध्या मोहन जोशी यांच्या मोठ्या कमबॅकची चर्चा जोरात सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news