'आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपट यादिवशी येणार

जरांगे लढ्याची प्रेरक कथा मोठ्या पडद्यावर
Amhi Jarange will release on 5 july
आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहेInstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : गरजवंत मराठ्यांचा लढा ऐकलं कि डोळ्यासमोर एकच नेत्याचं नाव येतं ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यावर आधारित “आम्ही जरांगे” हा सिनेमा लवकरच म्हणजेच ५ जुलै २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, अंगावर शहारे आणणारा याच चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीझ झालाय.

Amhi Jarange will release on 5 july
पवन कल्याण यांचे आंध्र प्रदेशच्या समृद्धीसाठी 11 दिवसांचे व्रत

या सिनेमात मनोज जरांगे यांची भूमिका अभिनेते मकरंद देशपांडे साकारताय. तसेच अभिनेता प्रसाद ओकने अण्णासाहेब जावळे पाटील ह्यांची भूमिका साकारली आहे. माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरकर साकारताय. सिनेमात इतर दिग्गज कलाकार जसे सुबोध भावे, विजय निकम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोंगडे, अंजली जोगळेकर, आरती त्रिमुखे, प्रेम नरसाळे ही महत्वाची भूमिका साकारत आहेत.

Amhi Jarange will release on 5 july
फिटनेस आयकॉन सोनू सूदचं वर्कआऊट व्हायरल, फतेहसाठी अशी घेतली मेहनत

नारायणा प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित या चित्रपटाचे सह निर्माते उत्तमराव नारायणराव मगर, डॉ. मधुसूदन उत्तमराव मगर, विक्रम विठ्ठलराव पाटील, दमयंती विठ्ठलराव पाटील, डॉ. दत्ता यशवंतराव मोरे, योगेश पांडुरंग भोसले हे आहेत. या जबरदस्त क्रांतिकारी चित्रपटाची कथा - पटकथा सुरेश पंडित यांनी लिहिली आहे. चित्रपटाचे संवाद सुरेश पंडित, संजय नवगिरे व किशोर गरड यांनी लिहिले असून, या चित्रपटाचे छायाचित्रकार विकास सिंह हे आहेत.

Amhi Jarange will release on 5 july
Hina Khan Breast Cancer | हिना खानला तिसऱ्या स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर, पोस्ट व्हायरल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news