पवन कल्याण यांचे आंध्र प्रदेशच्या समृद्धीसाठी 11 दिवसांचे व्रत

उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी 11 दिवसांच्या व्रताने राज्याच्या कल्याणासाठी घेतली अम्मावरी देवीची दीक्षा
Pawan Kalyan
पवन कल्याण यांचे आंध्र प्रदेशच्या समृद्धीसाठी 11 दिवसांचे व्रत File Photo

अभिनेता पवन कल्याण यांनी राजकारणात आपली नवीन ओळख निर्माण करत, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या असून, समोर आलेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या सुरुवातीलाच पवन कल्याण यांनी आपल्या राज्याच्या आणि तेथील लोकांच्या कल्याणासाठी 11 दिवसांचे दीर्घ व्रत करत आहेत.

Pawan Kalyan
मुख्यमंत्रिपद सोडा, शिवकुमारांना द्या

आध्यात्मिक मार्ग स्वीकारणे

पवन कल्याण आपल्या राज्यातील लोकांच्या सुख, समृद्धी आणि कल्याणासाठी व्रत करत आहेत बुधवारी (26 जून) पासून सुरू झालेली वाराही दीक्षा 11 दिवस चालणार आहे. याच अंतर्गत ते 11 दिवस उपवास करणार आहेत.

व्रताच्या माध्यमातून ते वाराही अम्मावरी देवीची पूजा करत असून; व्रताचे नियम कठीण आहेत. जून २०२३ मध्येही त्यांनी वाराही देवीची पूजा केली होती.

Pawan Kalyan
आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | शुक्रवार, २८ जून २०२४

वाराही अम्मावरी दीक्षा बद्दल अधिक

अहवालानुसार, वाराही अम्मावरी दीक्षा ज्येष्ठ महिन्याच्या शेवटी किंवा आषाढ महिन्यात पाळली जाते. ही दीक्षा नऊ किंवा अकरा दिवस चालते. दीक्षा घेणाऱ्या व्यक्तीने नियमित आहार टाळावा तसेच ‘सात्विक आहार’ निवडावा.

प्रक्रियेदरम्यान, व्यक्तीला जमिनीवर झोपावे लागते आणि अनवाणी राहते. असेही मानले जाते की व्यक्तीने मांसाहारी पदार्थ आणि दारू टाळली पाहिजे.

Pawan Kalyan
न्यायालयाच्या आवारातच साक्षीदारावर कोयताने हल्ला

पवन कल्याण यांची नवीन भूमिका

पवन कल्याण यांनी चंद्राबाबू नायडू सरकारमध्ये आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. पवन हे जनसेना पक्षाचे प्रमुख आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सदस्यांपैकी एक आहेत ज्यांनी आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुका एकत्र लढल्या होत्या. 2014 मध्ये त्यांनी जनसेना पक्षाची स्थापना केली.

पवन कल्याण तेलगू चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. तो के चिरंजीवीचा धाकटा भाऊ आहे. त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 1996 मध्ये अक्कडा अम्मी इक्काडा अब्बाय या चित्रपटाद्वारे केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news