जस्टिन बीबरने जावेद जाफरीच्या मुलीला दिलं आलिंगन, लाजली अलाविया

जस्टिन बीबरच्या आलिंगनाने लाजली अलाविया जाफरी
Alaviaa Jaffrey - Justin Bieber in music ceremony of anant ambani and radhika wedding
अलावियाने राधिका-अनंत अंबानीच्या संगीत सोहळ्याला हजेरी लावलीAlaviaa Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॉमेडियन जावेद जाफरीची मुलगी अलाविया जाफरी अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या भव्य संगीत समारंभात सहभागी झाली. ५ जुलैला सुरु झालेल्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये हॉलीवूड पॉप सिंगर जस्टिन बीबरची परफॉर्मन्स दिसला. अलावियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती लाजताना दिसली.

Alaviaa Jaffrey - Justin Bieber in music ceremony of anant ambani and radhika wedding
Hina Khan Breast Cancer | हिना खानला तिसऱ्या स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर, पोस्ट व्हायरल

अलावियाने व्हिडिओमध्ये जस्टीन बीबरसोबत खास क्षण कैद केले आहेत. जस्टीन देखील तिला आलिंगन देताना दिसतो.

अलावियाच्या चेहऱ्यावर स्पष्ट आनंद दिसतो. कारण, जस्टिनला आलिंगन दिल्यानंतर खूप वेळ स्टेज देखील शेअर केला.

Alaviaa Jaffrey - Justin Bieber in music ceremony of anant ambani and radhika wedding
पवन कल्याण यांचे आंध्र प्रदेशच्या समृद्धीसाठी 11 दिवसांचे व्रत

जस्टिन बीबरसोबत अलावियाचे खास क्षण

अलावियाचा भाऊ मीझानदेखील बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान, अनंत, वीर आणि शिखर पहाडिया यांच्यासोबत 'ऐसा पहली बार हुआ है' गाण्यावर परफॉर्म करताना दिसला. अनन्या पांडे आणि विद्या बालनदेखील एकत्र नाचताना दिसल्या. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिच्याशी संवाद साधला.

Alaviaa Jaffrey - Justin Bieber in music ceremony of anant ambani and radhika wedding
‘तू भेटशी नव्याने’ मालिकेत साकारणार खलनायिका

अंबानी कुटुंबीयांनीही बॉलिवूड स्टाईलने केले सादरीकरण

'ओम शांती ओम' चित्रपटातील 'दिवानगी दिवानगी' गाण्यावर अंबानी कुटुंबाने डान्स केला. ड्रेक, ॲडेल आणि लाना डेल रे यांसारखे अनेक प्रसिद्ध कलाकारही सादरीकरण करणार असल्याचे सनजते. हे लग्न १२ जुलै, २०२४ रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news