

तारा शर्माने अक्षय खन्नाच्या धुरंधर चित्रपटातील गाणे आणि अभियाचे कौतुक केले आहे. कधी काळी ते एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जाते. अक्षय आजही अविवाहित असल्याने त्यांच्या नात्याची चर्चा पुन्हा होत आहे.
एकीकीडे 'धुरंधर'च्या एका गाण्यात अक्षय खन्नावर चित्रीत करण्यात आलेल्या गाण्याने धुमाकूळ घातला आहे. दुसरीकेड अक्षय खन्नाच्या जुन्या डेटींगची चर्चा सुरु आङे. दरम्यान, अभिनेत्री आणि अक्षयची एक्स-गर्लफ्रेंड तारा शर्माने देखील त्याचे कौतुक केले आहे. तिने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून जुना फोटो शेअर करत अक्षयचे अभिनंदन केले आहे.
रहमान डकैतच्या भूमिकेतील त्याचा अफलातून अभिनय पाहून अभिनेत्री स्वत:ला रोखू शकली नाही.
तारा शर्माने काय म्हटलं?
तारा शर्माने अक्षय खन्नासोबत अनेक वर्षांपूर्वी क्लिक केलेला फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. सोबतच लिहिले, 'अक्षयचे खूप खूप अभिनंदन. आम्ही आतापर्यंत चित्रपट पाहिल नाही. पण आमच्या इन्स्टाग्राम फीड 'धुरंधर'ने भरलेले आहेत. विशेषकरून हे गाणे आणि यावर तुझी एंट्री. तुला आणि संपूर्ण टीमला खूप खूप अभिनंदन. हे गाणे आणि तुझा स्वॅग, तुझा ऑरा.'
अक्षय खन्नाचा 'धुरंधर'मधील डान्स आणि अभिनयावर अभिनेत्री तारा शर्माने प्रतिक्रिया दिली आहे. तारा आणि अक्षय कधीकाळी एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जाते.
अक्षय खन्नाने तारा शर्मासोबतच नातं एका मुलाखतीत सत्य असल्याचं सांगितलं होतं. एकेकाळी तारा शर्मा-अक्षय खन्ना एकमेकांना डेट करत होते. दोघे बालपणीचे मित्र आहेत आणि शाळेत देखील एकत्र शिकत होते. याविषयी जेव्हा अक्षयला करण जोहरने २००७ मध्ये शो 'कॉफी विथ करण' विचारलं तेव्हा तो म्हणाला, 'ते खरं नातं होतं.' पण त्याने दुसऱ्या मुलाखतीत सांगितलं की, तारासोबत रोमँटिक रिलेशनशिपबद्दल नकार दिला होता.
विशेष म्हणजे अक्षय आजही विवाहित नाही. त्याच्या अविवाहित राहण्याबद्दल अनेकदा प्रश्न विचारले गेले, पण अक्षयने नेहमीच स्पष्ट उत्तर दिलं आहे, त्याने सांगितलं की, लग्न ही त्याच्यासाठी ‘प्राथमिकता नाही’.