अक्षय वाघमारे करणार मरणोत्तर अवयव दान

akshay waghmare
akshay waghmare
Published on
Updated on

बिग बॉस मराठी सीजन ३ च्या दुसऱ्या आठवड्याला सुरूवात होताच स्पर्धकांमध्ये परस्परांविरूध्द शाब्दिक टशन दिसू लागली आहे. बुध्दीचातुर्य आणि शक्तीच्या ह्या खेळात अनेकांनी घातलेले सभ्यतेचे मुखवटे आता गळून पडले आहेत. त्यांचे खरे चेहरे बाहेर आले आहेत. मात्र, यांमध्ये अक्षय वाघमारे हा एकमेव सदस्य अपवाद ठरला. घरात वावरताना असो वा टास्क दरम्यान असो अक्षय वाघमारेने आपला संयम कधीच ढासळू दिला नाही.

त्याचा हा संयमीपणा चाहत्यांना आवडत आहे. खऱ्या आयुष्यातही तो तितकाच नम्र आणि संवेदनशील असल्याचं त्याच्या एका कृतीतून दिसून आलं आहे. बिग बॉसच्या घरात जाण्याआधी अक्षयने मरणोत्तर अवयवदानाचा निर्णय घेतलाय, अशी माहिती समोर आली आहे.

याबाबत, संबंधित संस्थेकडे त्याने मरणोत्तर अवयवदानाचे संमतीपत्र भरून देखील दिले आहे. त्या संमती पत्रानुसार तो मृत्यूनंतर फुफ्फुस, मुत्रपिंड, स्वादुपिंड, किडनी आणि त्वचा दान करणार आहे.

विशेष म्हणजे, याबद्दल खूपच कमी जणांना माहिती आहे. त्याच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक तर होत आहे; पण त्याबरोबरच त्याने केवळ बिग बॉसच्या घरात नाही तर सर्व चाहत्यांच्या हृदयात आपली जागा मिळवली आहे !

बिग बॉस मराठीच्या घरात आपल्याहून वयाने मोठे असलेल्या सदस्यांचा तो नेहमी आदर करताना दिसून येत आहे. त्यामुळे घरातील सदस्यांच्या गुडबूक्समध्ये तो आलाय. पुढे तो कोणती स्ट्रॅटर्जी वापरणार हे पाहणं रंजक ठरणार आहे!

Akshay Waghmare
Akshay Waghmare

कोण आहे अक्षय?

अक्षय हा अभिनेता आहे. तो अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीचा जावई आहे. त्‍याने अरुण गवळीची मुलगी योगिताशी ८ मे रोजी लग्न केलं होतं. अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्याच्या लग्नाचे फोटो शेअर केले होते. २०१९ च्या डिसेंबर महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला होता. तेव्हाच लग्नाची तारीखही नक्की करण्यात आली होती. २९ मार्च २०२० मध्ये हे लग्न होणार होतं. मात्र अचानक आलेल्या लॉकडाउनमुळे लग्न पुढे ढकललं. अखेर ८ मे २०२० रोजी दोघं लग्नाच्या बेडीत अडकले.

अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. अनेक अडचणींच्या काळात अक्षय आणि योगिताने एकमेकांना आधार दिला होता.

अक्षयने फत्तेशिकस्त, बस स्टॉप, दोस्तीगिरी, बेधडक आदी चित्रपटात काम केलं आहे.

हेही वाचलं का?

  • आर्यन खान : हे कसले आदर्श?
  • रेव्ह पार्टी नंतर वरण-भात अन् बिर्याणी
  • Hyderabad vs Royal Challengers : आरसीबीचे टार्गेट 'टॉप-२'चे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news