Bhoot Bangla trailer | अक्षय कुमारसोबत जुनी गँग पुन्हा मैदानात! 'भूत बंगला'मध्ये 'या' सुपरस्टारची एन्ट्री; ट्रेलर पाहून फुटलं हसू

Akshay Kumar Bhoot Bangla Trailer Release-अक्षय कुमारसोबत मैदानात हे कलाकार! 'भूत बंगला'मध्ये 'या' सुपरस्टारची एन्ट्री; ट्रेलर पाहून प्रेक्षकांना फुटलं हसू
akshay kumar Bhoot
akshay kumar Bhoot Bangla trailer released instagram
Published on
Updated on

बॉलीवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार आणि विनोदी चित्रपटांचे बादशाह दिग्दर्शक प्रियदर्शन तब्बल १४ वर्षांनंतर 'भूत बंगला' या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात राजपाल यादव, परेश रावल आणि असरानी यांची जुनी जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना खदखदून हसवण्यासाठी सज्ज झाली आहे.

Bhoot Bangla trailer out

बॉलीवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार आणि दिग्गज दिग्दर्शक प्रियदर्शन जोडी पुन्हा धुमाकूळ घालायला सज्ज झालीय. 'हेरा फेरी', 'भूल भुलैया' सारखे हिट विनोदी चित्रपट त्यांनी दिले आहेत. तब्बल १४ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ही जोडी पुन्हा एकदा 'भूत बंगला' (Bhoot Bungla) या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना हसवायला आणि घाबरायला सज्ज झाली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर त्याचीच चर्चा रंगली आहे.

akshay kumar Bhoot
Mrunal Thakur: 'सीतारामम'ची नाजूक 'सीता' आता बनली 'लेडी डाकू'? मृणालचा थक्क करणारा बदल; ट्रेलरमधील 'त्या' सीनची सर्वत्र चर्चा

'भूत बंगला'च्या निमित्ताने केवळ अक्षय आणि प्रियदर्शनच नव्हे तर अक्षयची 'कॉमेडी गँग' देखील पुन्हा मैदानात उतरली आहे. ट्रेलरमध्ये राजपाल यादव, परेश रावल, आणि असरानी यांची झलक पाहायला मिळत आहे. या दिग्गज कलाकारांना एकत्र पाहून चाहत्यांच्या जुन्या आठवणी नक्कीच ताज्या झाल्या असणार.

काय आहे 'भूत बंगला'ची झलक?

ट्रेलरची सुरुवात एका गूढ आणि भयावह महालापासून होते. मात्र, जसा अक्षय कुमारचा प्रवेश होतो, तसा भीतीचा माहोल विनोदात बदलतो. अक्षय कुमार पुन्हा एकदा त्याच्या सिग्नेचर स्टाईलमध्ये दिसतोय. 'भूल भुलैया' मधील त्याचा 'डॉ. आदित्य श्रीवास्तव' आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे, आणि 'भूत बंगला' मध्येही तो थोडा मजेशीरही दिसतो. दुसरीकडे, अभिनेत्री वामी गब्बीचीही झलक यात दिसतेय.

akshay kumar Bhoot
Gaurav More Wedding and New House | कसं आहे गौरव मोरेचं नवीन घर? 'फिल्टरपाड्याच्या बच्चन'च्या आलिशान घरात नव्या लक्ष्मीची पावले, कोण आहे अर्धांगिनी?

हसता हसता फुटणार घाम?

चित्रपटाचा जॉनर 'हॉरर-कॉमेडी' (Horror Comedy) आहे. ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे, एका झपाटलेल्या बंगल्यात ही संपूर्ण गँग अडकते आणि तिथून बाहेर पडण्यासाठी होणारी त्यांची धडपड प्रेक्षकांना खदखदून हसवणारी ठरेल. विशेषतः राजपाल यादवचे एक्सप्रेश्नस पाहण्यासारखे आहेत. तर दुसरीकडे, अक्षय कुमारची 'कॉमेडी टायमिंग' देखील तितकीच प्रभावी आहे.

प्रियदर्शनची जादू पुन्हा चालणार?

प्रियदर्शन आणि अक्षयच्या चित्रपटांनी नेहमीच प्रेक्षकवर्ग खेचून आणला आहे. 'भूत बंगला'मध्येही तेच सूत्र दिसते आहे. त्यामुळे अक्षय कुमारच्या चाहत्यांना पुन्हा एकदा आपल्या आवडत्या अभिनेत्याला अभिनय करताना पाहणे, पर्वणीच असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news