

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता गौरव मोरे (Gaurav More) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गौरवने त्याची दीर्घकाळाची मैत्रीण प्रियांका कारेकर (Priyanka Karekar) हिच्याशी अत्यंत साध्या पद्धतीने लग्नगाठ बांधल्याची माहिती समोर आली आहे. लग्नानंतर या जोडप्याने गौरवने मुंबईच्या पवई (Powai) भागात घेतलेल्या नव्या आलिशान घरात गृहप्रवेश केला असल्याचे म्हटले जाते.
Gaurav More Wedding and New House photos viral
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम आणि 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणून घराघरात पोहोचलेल्या गौरवने नुकतेच मुंबईत स्वतःचे 'हक्काचे घर' घेतले आहे. विशेष म्हणजे, घराच्या गृहप्रवेशासोबतच गौरवने लग्नाची गाठ बांधत चाहत्यांना डबल सरप्राईज दिले आहे.
अभिनेता गौरव मोरेच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर काही स्नॅप शॉट्स शेअर केलेत. ज्यामध्ये त्याचे सहकारी, मित्र मंडळी, पाहुणे आणि कलाकारांनी त्याच्या नव्या घराचे फोटो अपलोड केलेले दिसताहेत. सोबतच अभिनंदनाचा पाऊस देखील त्याच्यावर पाडला आहे.
फिल्टरपाडा ते मुंबईचा आलिशान फ्लॅट
प्रत्येकाला वाटतं की आपलं एखादं घर असावं. गौरवचेही असेच एक सुंदर स्वप्न सत्यात उतरलं आहे. मुंबई एका साध्या चाळीतून सुरू झालेला हा प्रवास एका आलिशान फ्लॅटपर्यंत पोहोचला आहे.
कसं आहे गौरव मोरेचं नवीन घर? खास इंटिरिअर
मॉडर्न आणि क्लासिक लूक: गौरवच्या घराचे इंटिरिअर हे रॉयल टच ठेवण्यात आले आहे. भिंतींसाठी पेस्टल आणि वॉर्म व्हाईट रंगांचा वापर केल्यामुळे घर अधिक प्रशस्त आणि उजळ दिसते. बेडरुम खास सजवण्यात आलीय.
लाईटिंग: घरामध्ये डिझायनर झुंबरांचा वापर करण्यात आला आहे. हे लाईट्स घराला शोभा देतील, असे आहे.
लाकडी फर्निचर: घराच्या हॉलमध्ये लाकडी फिनिशिंग असलेले फर्निचर आणि टीव्ही युनिट आहे.
सुंदर बुद्धांची मूर्ती : गौरवने आपल्या घरात एक छोटेखानी गौतम बुद्धांची मूर्ती ठेवलीय.
बाल्कनी व्ह्यू: गौरवच्या नव्या घराच्या बाल्कनीतून मुंबईचे सुंदर फ्लॅट्स दिसतात.
प्रथमेश परब, अभिनय बेर्डे, ऋतुजा बागवेने त्याला घरासाठी आणि नव्या सुनबाईसाठी शुभेच्छा आणि अभिनंदन केलं आहे.
ऋतुजा बागवेच्या पोस्टमुळे लग्नाची माहिती समोर
अभिनेता गौरव मोरे लग्नबंधनात अडकल्याची माहिती ऋतुजा बागवेच्या पोस्टमुळे समोर आली. तिने सोशल मीडियावर दोघांचे फोटो शेअर केले.
कोण आहे गौरव मोरेची पत्नी?
प्रियांका कारेकर असं तिचं नाव आहे. तिच्या इन्स्टाग्राम पेजवरून कळतं की, ती आर्टिस्ट आहे. तच्या इन्स्टावर गौरवसोबतचा एक जुना फोटो देखील पाहायला मिळतो. ते एखमेकांना डेट करत असल्याचे म्हटलं जातंय.