

Actress serious allegations on Ajaz Khan
मुंबई : अभिनेता एजाज खान अलिकडेच रिॲलिटी शो हाऊस अरेस्टमधील वादामुळे चर्चेत आला आहे. त्याच्यावर आता मुंबई पोलिसांनी लैंगिक अत्याचाराच्या गंभीर आरोपांनंतर गुन्हा दाखल केला आहे. ३० वर्षींय एका अभिनेत्रीने एजाज विरोधात पोलिसांत तक्रार दिली. संबंधित अभिनेत्रीने आरोप केला आहे की, एजाजने तिला लग्न करण्याचे आणि 'रिॲलिटी शो हाऊस अरेस्ट'मध्ये काम देण्याचे वचन दिले होते. दरम्यान, त्याने जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केले. या आरोपानंतर एजाज खानच्या अटकेची शक्यता वाढली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अभिनेत्रीने चारकोप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तिने तक्रारीत म्हटलंय - एजाज खानने तिला हाऊस अरेस्ट शो होस्ट करण्याची ऑफर दिली होती. शूटिंग वेळी एजाज खानने तिला लग्नासाठी प्रपोज केले आणि नंतर घरी घेऊन गेला. २५ मार्चला जबरदस्तीने शारीरिक संबंध बनवले. अभिनेत्रीने गंभीर आरोप केले आहेत की, एजाज खानने अनेकदा तिच्यासोबत जबरदस्ती केली. आणि तिला सांगितले की, त्याच्या धर्मात ४ लग्ने करण्यास परवानगी आहे. तो तिची संपूर्ण जबाबदारी घेईल.
याआधी एजाज खानला त्याचा शो 'हाऊस अरेस्ट'मध्ये अश्लील कंटेट स्ट्रीम केल्याने गुन्हा दाखल झाला आहे. उल्लू ॲपवर स्ट्रीम होणारा या शोची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. ज्यामध्ये एजाज खान संबंधित महिलांसहित स्पर्धकांवर अश्लील कृत्य करण्यासाठी सांगताना दिसत होता. त्यामुळे अशा अश्लिल कंटेंटवर बंदी आणण्याची मागणी होत आहे.