The Future of OTT: OTT वर स्टार्सची जादू संपली? कोट्यवधींचं मार्केटिंगही फेल; आता AI ठरवतंय कोणता शो होणार सुपरहिट

AI Is Replacing Star Power: AI प्रेक्षकांच्या आवडीनुसार कंटेंट सुचवतं, त्यामुळे मोठे स्टार्स नसतानाही चांगल्या कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत.
AI Is Replacing Star Power
AI Is Replacing Star PowerPudhari
Published on
Updated on

AI Is Replacing Star Power: एकेकाळी एखादी वेब सीरिज किंवा चित्रपट यशस्वी होण्यासाठी मोठे कलाकार, प्रचंड मार्केटिंग आणि कोट्यवधींचं बजेट लागतं होतं. आता मात्र OTT प्लॅटफॉर्मवरील चित्र वेगाने बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), अल्गोरिदम आणि आपल्या आवडीनुसार दिल्या जाणाऱ्या शिफारसींमुळे छोट्या बजेटमधील आणि प्रादेशिक कथा असलेल्या वेब सीरिजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.

OTT प्लॅटफॉर्मवरील कंटेंटची संख्या झपाट्याने वाढत असताना प्रेक्षकांसमोर हजारो पर्याय उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत केवळ लोकप्रिय किंवा मोठ्या स्टार्सचे चित्रपट पुढे आणण्याऐवजी, आता प्लॅटफॉर्म प्रेक्षकांच्या आवडीनिवडीनुसार त्यांना योग्य कंटेंट सुचवण्यासाठी AI आधारित शिफारस सिस्टीमचा वापर करत आहेत.

तुम्ही काय पाहणार हे AI ठरवतय

Netflix, ZEE5, Chaupal आणि इतर अनेक OTT प्लॅटफॉर्म आता AI आधारित Recommendation Engine वापरत आहेत. ही सिस्टीम प्रेक्षकांनी यापूर्वी पाहिलेला कंटेंट, त्यांची आवड, भाषा, शैली, मूड आणि पाहण्याची सवय यांचे विश्लेषण करून त्यानुसार नवीन चित्रपट किंवा वेब सीरिज सुचवते. यामुळे मोठ्या स्टार्स शिवाय किंवा मोठ्या जाहिराती शिवाय तयार झालेल्या अनेक वेब सीरिज प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत.

छोट्या बजेटच्या कथा ठरत आहेत सुपरहिट

अलीकडील काळात 'Chiraiya', 'Ab Hoga Hisaab' आणि 'Made in India: A Titan Story' यांसारख्या छोट्या बजेटमधील वेब सीरिज आणि माहितीपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या निर्मितींमध्ये मोठे स्टार्स नसतानाही त्यांच्या दमदार कथेमुळे त्या लोकप्रिय ठरल्या.

तज्ज्ञांच्या मते, प्रेक्षक आता केवळ प्रसिद्ध कलाकारांमुळे कंटेंट पाहत नाहीत. त्यांना वास्तवाशी जोडलेल्या, स्थानिक संस्कृती असणाऱ्या आणि वेगळा अनुभव देणाऱ्या कथा अधिक आकर्षित करत आहेत.

Metadata ची भूमिका ठरते महत्त्वाची

OTT प्लॅटफॉर्मवर एखादा कंटेंट योग्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी Metadata अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. यामध्ये चित्रपट किंवा मालिकेचा प्रकार (Genre), विषय, मूड, भाषा, कलाकार, कथा आणि इतर माहितीचा समावेश असतो.

AI ही माहिती वापरून प्रेक्षकांच्या आवडीनुसार कंटेंटची शिफारस करते. तज्ज्ञांच्या मते, केवळ AI पुरेसा नाही. योग्य आणि अचूक Metadata असेल तरच प्रेक्षकांना योग्य कंटेंट शोधणे अधिक सोपे होते.

'Mood-Based' Recommendation ची वाढती लोकप्रियता

अनेक OTT प्लॅटफॉर्म आता Mood-Based Recommendation ही सुविधा देत आहेत. उदाहरणार्थ, एखाद्या प्रेक्षकाला कॉमेडी, थ्रिलर, रोमँटिक किंवा प्रेरणादायी स्टोरी पाहायची असल्यास AI त्याच मूडशी जुळणारा कंटेंट सुचवतं. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या आवडीनुसार नवीन वेब सीरिज शोधणे सोपे होते.

सोशल मीडियाचाही मोठा वाटा

आज कंटेंट लोकप्रिय होण्यात सोशल मीडिया आणि Influencers यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. Instagram, YouTube, X (Twitter) यांसारख्या प्लॅटफॉर्मवर ट्रेलर, बिहाइंड-द-सीन्स व्हिडिओ, पॉडकास्ट आणि छोट्या क्लिप्स शेअर करून OTT प्लॅटफॉर्म प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करत आहेत. विशेष म्हणजे, मोठ्या सेलिब्रिटींपेक्षा Micro Influencers आता नवीन कंटेंट लोकांपर्यंत पोहोचवण्यात अधिक प्रभावी ठरत आहेत.

AI Is Replacing Star Power
Shah Rukh Khan : शाहरुख खानची 'मन्नत' होणार पूर्ण; घरावर आणखी २ मजले बांधण्यास सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी

स्थानिक कथांना प्राधान्य

OTT प्लॅटफॉर्मवरील प्रेक्षकांची आवडही बदलत आहे. आता केवळ मोठ्या शहरांतील किंवा भव्य कथांऐवजी छोट्या शहरांतील, स्थानिक संस्कृतीवर आधारित आणि सत्य घटनांवर प्रेरित कथा अधिक पसंत केल्या जात आहेत.

'Hathras: 16 Days' आणि 'Honeymoon Se Hatya' यांसारख्या वास्तव घटनांवर आधारित कथांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. तज्ज्ञांच्या मते, प्रेक्षक आता अशा कथा शोधत आहेत ज्या त्यांच्या आयुष्याशी, समाजाशी आणि वास्तवाशी जोडलेल्या आहेत.

AI Is Replacing Star Power
Khalid Ka Shivaji OTT Release: वादात सापडलेला 'खालिद का शिवाजी' आता OTT वर; कधी आणि कुठे पाहता येणार?

OTT चे भवितव्य AI ठरवणार?

मनोरंजन क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे की, भविष्यात OTT प्लॅटफॉर्मवर कोणता चित्रपट किंवा वेब सीरिज लोकप्रिय ठरेल, हे केवळ स्टार कलाकार किंवा मोठ्या बजेटवर अवलंबून राहणार नाही.

AI, प्रादेशिक कंटेंट, दमदार कथा आणि प्रेक्षकांच्या बदलत्या आवडीनिवडी यावरच OTT चे भवितव्य ठरणार आहे. एकूणच, OTTवर आता 'स्टार पॉवर'पेक्षा 'स्टोरी पॉवर' अधिक महत्त्वाची ठरत असून, दमदार कथा असेल तर कमी बजेट आणि नवीन कलाकारांनाही चांगला प्रतिसाद मिळू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news