अहान शेट्टी-तारा सुतारिया यांचा ‘तडप’चा टीजर प्रदर्शित!

अहान शेट्टी-तारा सुतारिया यांचा ‘तडप’चा टीजर प्रदर्शित!
Published on
Updated on

फॉक्स स्टार स्टूडियोजची प्रस्तुती आणि सह-निर्मिती असलेला तडप चित्रपटाचा टीजर होतोय. साजिद नाडियाडवाला यांचा 'तडप' निश्चितच यावर्षी प्रदर्शित होणार आहे. बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक चित्रपट आहे. जेव्हापासून चित्रपटाच्या निर्मात्यांनी या अनोख्या प्रेमगाथेच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली आहे. तेव्हापासून चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. याच उत्सुकतेला थोडे अधिक ताणत निर्मात्यांनी आज या रोमँटिक ॲक्शन ड्रामाच्या टीजरचे अनावरण केले आहे. अहान शेट्टी-तारा सुतारिया यांच्या तडप या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. मिलन लुथरिया दिग्दर्शित, अहान शेट्टी-तारा सुतारिया स्टारर चित्रपटात या दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळेल.

या टीझरमध्ये अहान आणि तारा यांनी रंगवलेल्या इशान आणि रमिसा यांच्या जगाची झलक मिळणार आहे. त्यांच्या व्यक्तिरेखांना उत्तम प्रकारे स्थापित करण्यात आले आहे. त्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढत आहे. सुंदर रामिसा हिमाच्छादित पर्वतांच्या नयनरम्य ठिकाणी दिसत आहे. तर इशान तिच्या बाईकसह मर्दानी अवतारात दिसत आहे. अहान त्याच्या शर्टलेस अवतारात डॅशिंग दिसत आहे. तारा खूपच सुंदर दिसत आहे.

विशेष म्हणजे अहान आणि तारा या दोघांनीही त्यांच्या सोशल मीडियावर टीझर पोस्ट केला आहे.

हा तेलगू ब्लॉकबस्टर RX 100 चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा पहिला मोठा रोमँटिक ड्रामा आहे. हा चित्रपट 3 डिसेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

हेही वाचलं का?

 

View this post on Instagram

 

A post shared by Ahan Shetty (@ahan.shetty)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ahan Shetty (@ahan.shetty)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news