Aditya Narayan : आदित्यची पत्नी श्वेताने फ्लॉन्ट केले बेबी बंप (Photo viral)

aditya narayan shweta agarwal
aditya narayan shweta agarwal
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन

टीव्ही होस्ट आणि गायक आदित्य नारायण (Aditya Narayan) आणि त्याची पत्नी श्वेता अग्रवाल (Shweta Agarwal) लवकरचं आई-बाबा होणार आहेत. आदित्यने सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर हे वृत्त समोर आले. सोशल मीडियाच्या माध्यमातून आदित्य नारायणने (Aditya Narayan) इन्स्टाग्रामवर पत्नी श्वेता अग्रवालसोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोन्ही कपल स्माईल करताना दिसत आहेत. श्वेता क्रॉप टॉप आणि जीन्समध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसतेय.

या कपलचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आदित्य नारायणने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की- 'श्वेता आणि मी आपल्या सर्वांच्या प्रार्थना आणि आशीर्वादामुळे लवकरचं या जगात आमच्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहे. बेबी ऑन द वे.'

याआधी आदित्य नारायणने खास अंदाजात श्वेताला बर्थडे विश केलं होतं. त्यावेळी त्याने त्यांचा खूप सुंदर फोटो शेअर करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

आदित्यने एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, 'श्वेता आणि मी या फेजची खूप प्रतीक्षा करत होतो. आम्हा दोघांनाही मुले खूप आवडतात. आणि मला बाबा व्हायचं होत;पण, श्वेताला डबल काम करावं लागेल. कारण, मी एखाद्या बाळापेक्षा कमी नाहीये.

आदित्य म्हणाला की, त्याचं स्वप्न होतं की, नर्सिंग होममध्ये श्वेता त्याच्या मुलाला कुशीत घेऊन उभी असेल. त्याने २०१७ मध्ये आपल्या ३० व्या जन्मदिनी श्वेताकडे आपली इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा दोघांचा साखरपुडादेखील झाला नव्हता. हे एखाद्या कथेप्रमाणे होते. आदित्यचं म्हणाला की,-'मला आऩंद आहे की, माझं हे स्वप्न लवकरचं पूर्ण होणार आहे. आम्ही लवकरचं पालक होणार आहोत. संपूर्ण परिवारासोबत आम्ही लवकरच ओटीभरणीचा कार्यक्रम करू.'श्वेता-आदित्यने १० वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर डिसेंबर २०२० मध्ये लग्न केलं होतं.

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news