गोवा : ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार सीताराम टेंगसे यांचे निधन | पुढारी

गोवा : ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार सीताराम टेंगसे यांचे निधन

मडगाव, पुढारी वृत्तसेवा: ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार तसेच वक्ते सीताराम टेंगसे यांचे मंगळवारी (दि.२५) रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी वयाच्या ८५ वर्षी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ पत्रकार व फोटो जर्नलिस्ट अरविंद टेंगसे यांचे ते वडील होते. गेल्या वर्षभरापासून सीताराम टेंगसे हे फोंडा येथील स्नेहमंदिर या वृद्धाश्रमात वास्तव्यास होते. याच दरम्यान त्यांचे निधन झाले.

आपल्या कार्यकाळात त्यांनी गोमंत विद्या निकेतनचे सदस्यपदही भूषविले आहे. मंगळवारी संध्याकाळी ४ वाजता मठग्रामस्थ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button