Rinku Rajguru : ‘सैराट २’ कधी येणार?; रिंकूला ‘या’ लूकमध्ये पाहून फॅन्सला आठ‍वली आर्ची

Rinku Rajguru
Rinku Rajguru
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक नागपराज मंजुळे यांच्या 'सैराट' चित्रपटातील आर्चीला कोण बंर ओळखत नाही. आर्ची म्हणजे, मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू होय ( Rinku Rajguru ) . 'सैराट' चित्रपटाच्या यशानंतर रिंकूने 'मेकअप', 'कागर', 'आठवा रंग प्रेमाचा' आणि 'झुंड' यासारख्या अनेक चित्रपट साकारले. मात्र, तिच्या पहिल्या 'सैराट'ची क्रेझ आजही चाहत्यांच्या पाहायला मिळतेय. याशिवाय रिंकू तिचे मराठमोळ्या लूकमधील आणि हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या रिंकूने उन्हाळ्याच्या सुट्टया खास बनवत फोटोशूट केलं आहे.

मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूने ( Rinku Rajguru ) नुकतेच उन्हाळ्याच्या सुट्टया एन्जॉय करताना काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिने पर्पल कलरच्या ड्रेसमधील पाच फोटो शेअर केलेत. पहिल्या फोटोत रिंकू एका बाईकजवळ उभी असून वर पाहताना दिसतेय. दुसऱ्या एका फोटोत आंब्याच्या झाडावर चढून स्वत: च्या पायाच्या टाचेकडे एकटक पाहताना दिसतेय. तिसऱ्या फोटोत माडी घालून खाली बसलेली दिसतेय. चौथ्या फोटोत ती घराच्या जवळच्या झाडांचे निरक्षण करताना दिसतेय. आणि शेवटच्या पाचव्या फोटोत ती लाकडी खुर्चीच्या पाठिमागे उभी असलेली दिसतेय.

रिंकूने या फोटोंच्या कॅप्शनमध्ये "उन्हाळ्याच्या सुट्टया…" असे लिहिले आहे. गळ्यात चेन, हातात अंगठी आणि केसांचा अंबाडा असा लूक तिने पूर्ण केलाय. रिंकूचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तिच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव केलाय. 'Enjoy every purple moment', 'Cute❤️', 'Archi so cute❤️', 'Ek ladki ko dekha to aisa lga….', 'Crush', 'Love birds', 'Ur my favourite', 'Nice photo', 'अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य', 'looking very beautiful', 'Woww', 'Beauty 😍'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

याशिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केलेत. दरम्यान एका नेटकऱ्यांने 'सैराट २ कधी येणार?' अशा प्रश्न उपस्थित केला आहे. या फोटोंना ५ तासांत ५३ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news