

जावेद अख्तर - हनी ईरानी यांच्यात दुरावा असतानाही हनीने शबाना आजमीचे समर्थन केले. त्या म्हणाल्या की, कुटुंबात प्रेम आणि सन्मान आहे, जे मुलांसाठी महत्वपूर्ण आहे.
Javed Akhtar lunch with ex-Wife and family
मुंबई - जावेद अख्तरने पत्नी शबाना आजमी, मुलगा फरहान अख्तर, सून शिबानी दांडेकर आणि एक्स पत्नी हनी ईरानी सोबत लंच केलं. जावेद आणि हनी यांच्यात दुरावा अशतानाही मुलांसाठी एकमेकांबद्दल सन्मान आणि प्रेम टिकून ठेवलं आहे. त्यांचा लंच टाईम फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शबाना आजमीद्वारा सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या पोटोंवर फॅन्सनी कॉमेंट्स दिल्या आहेत. अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे.
शबाना आजमी यांनी इन्स्टाग्रामवर लिहिलं, "एका सुंदर रेस्टॉरंटमध्ये परिवार!'' सेल्फी शिबानी दांडेकरने घेतली आणि त्यामध्ये तयार अन्नपदार्थांनी भरलेला एक टेबल दिसत आहे.
काही काळ डेट केल्यानंतर जावेद अख्तर -हनी ईरानी यांनी १९७२ मध्ये लग्न केले होते. सीता और गीता चित्रपटावर काम करताना ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यांना दोन मुले देखील आहेत. पण वैयक्तिक मतभेदांमुळे त्यांचे लग्न टिकू शकल नाही.
रिपोर्टनुसार, हनी यांने जावेद यांची दुसरी पत्नी शबाना आजमी यांचे समर्थन केले आणि म्हणाल्या की, त्यांचे लग्न संपुष्टात येण्यासाठी ती जबाबदार नव्हती. "जावेद अख्तर यांच्यापासून दूर गेल्यानंतर मला राग आला आणि हे सर्व घडलं, पण मी कधी ड्रामेटिक राहिले नाही."
जावेद अख्तर यांनी १९८४ मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आजमी यांच्याशी दुसरे लग्न केले होते.