

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री अक्षया गुरवने नवीन वर्ष दणक्यात सुरु केलं आहे. नवीन वर्षीच ग्लॅमरस फोटो पोस्ट करुन , फॅन्सना चांगली भेट दिली. तिच्या या फोटोने सोशल मीडीयावर चांगलीच पसंती मिळवली आहे. २०२३ ची अशी चांगली सुरुवात झाल्यानंतर अक्षया गुरव आता नवीन वर्षात नवीन चॅलेंजेस घेण्यासाठी सज्ज झाली आहे. अक्षयाला या बद्दल विचारले असता अक्षया सांगते, २०२२ हे वर्ष माझ्यासाठी खूप चांगलं गेलं. मी काही उत्तम सिनेमा शूट केले. त्यात सुजय डहाकेचा श्यामची आई, समित कक्कड यांचा रानटी, तसेच डंका या सिनेमांचा समावेश आहे. हे सर्व सिनेमा या वर्षी प्रदर्शित होतील याची उत्सुकता आहे. त्यामुळे या वर्षी अक्षयाच्या विविध भूमिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे. त्याचप्रमाणे २०२२ च्या इफ्फीमध्ये 'फ्रेम' हा सिनेमा दाखवण्यात आला होता. 'फ्रेम'ही यावर्षी प्रदर्शित होणार आहे.
त्याचप्रमाणे अक्षयासाठी हे वर्ष महत्वाचं आहे, त्या बद्दल ती सांगते, 'गेल्या वर्षी राज्य पुरस्कारांमध्ये 'रिवणावायली' या सिनेमासाठी मला नामांकन मिळाले आहे. या पुरस्कारांची प्रतीक्षा या वर्षी आहे.' अक्षयाला या वर्षी सिनेमा -वेबसिरीज अशा माध्यमातून उत्तमोत्तम काम करायचं आहे. कामा व्यतिरीक्त स्वतःच्या फिटनेसवर लक्ष द्यायचं आहे.'
ती जास्तीत जास्त नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करायचे आहेत. मला वेगवेगळ्या जागा पाहायला आवडतं, नवीन माणसांना भेटायला आवडतं. त्यामुळे खूप फिरायचं आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी मनात आहेत आणि जास्तीत जास्त गोष्टी करण्याचा प्रयत्न आहे'. त्याचप्रमाणे अधिक उत्तम व्यक्ती व्हायचं आहे' असं अक्षयानं नवीन वर्षाचे प्लॅनिंग आहे.