Pathaan : सेन्सॉरने पठानमधील वादग्रस्त १० हून अधिक सीन्सवर लावली कात्री | पुढारी

Pathaan : सेन्सॉरने पठानमधील वादग्रस्त १० हून अधिक सीन्सवर लावली कात्री

पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरुख खानचा पठान चित्रपट वादग्रस्त दृश्यांमुळे वादात अडकलाय. (Pathaan) चित्रपटाच्या टीजरनंतर हा चित्रपट चर्चेत आहे. बेशरम रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. या गाण्यात दीपिका पादुकोणने परिधान केलेल्या बिकिनीच्या भगव्या रंगावरून अनेकांनी आक्षेप घेतला. यानंतर सेन्सॉर बोर्डाने गाण्यात आणि वादग्रस्त दृश्यांमध्ये बदल करण्याच्या सूचना निर्मात्यांना दिल्या होत्या. आता नव्या अपडेटनुसार, सेन्सॉर बोर्डाने तब्बल १० दृश्यांना कात्री लावल्याची माहिती समोर आलीय. आता पठान २०२३ मधील पहिला चित्रपट आहे, ज्यावर सेन्सॉर बोर्डाने कात्री लावलीय. (Pathaan)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणच्या चित्रपटात आणि बेशरम गाण्यातील काही सीन्स हटवण्यासाठीच्या सूचना दिल्या होत्या. सीबीएफसीने पठानमधील १० हून अधिक कट लावले आहेत.

रिपोर्ट्सनुसार, ‘रॉ’ शब्दाच्या जागी ‘हमरे’, ‘लंगडे लुल्ले’च्या जागी ‘टूटे फूटे’, आणि १३ ठिकाणांहून ‘राष्ट्रपती वा मंत्री’ आणि ‘पीएमओ’ शब्द हटवण्यात आले आहेत. ‘अशोक चक्र’ला ‘वीर पुरस्कार’, ‘पूर्व-केजीबी’ ला ‘पूर्व-एसबीयू’ आणि ‘श्रीमती भारत माता’ ला ‘हमारी भारत माता’ असा बदल केला आहे.

या रिपोर्टमध्ये पुढे म्हणण्यात आले आहे की, ‘स्कॉच’ शब्दाच्या जागी ‘ड्रिंक’ असा बदल करण्यात आला. ‘ब्लॅक प्रिजन, रूस’ च्या जागी ‘ब्लॅक प्रिजन’ असा बदल करण्यात आला होता. याशिवाय बेशरम रंगमध्ये दीपिकाचे अनेक सीनला साईड पोझ बदलण्यात आले आहेत. ‘बहुत तंग किया’ गाण्यातील सेंसुअल डान्स हटवण्यात आले आहे. त्याठिकाणी दुसरे शॉर्ट्स लावण्यात आले आहेत.

इतके बदल करून चित्रपटत सेन्सॉरने यूए सर्टिफिकेट दिलं आहे. २ तास २६ मिनिटांचा हा चित्रपट २५ जानेवारी रोजी चित्रपटगृहात रिलीज करण्यात आला आहे. याचित्रपटामध्ये शाहरुख – दीपिका, जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत.

Back to top button