

Actor Yash KGF 3 final script ready
मुंबई - केजीएफची पुढील फ्रेंचायझी ‘केजीएफ: चॅप्टर ३’ ही घोषणा आता सत्यात उतरणार आहे. सुपरस्टार यश आणि दिग्दर्शक प्रशांत नीलने याबाबत मोठी अपडेट दिलीय. प्रशांत नील म्हणाले की, ‘‘केजीएफ: चॅप्टर ३ होणार आहे; स्क्रिप्ट लॉक झाली आहे.
यशचा बहुप्रतीक्षित चित्रपट केजीएफचे तमाम फॅन्स आहेत. केजीएफ चॅप्टर २ हा चित्रपट २०२२ मध्ये रिलीज झाला होता. त्यावेळी तो सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला होता. चित्रपटात यश शिवाय संजय दत्त, रवीना टंडन आणि श्रीनिधी शेट्टी मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केलं होतं. प्रशांत नील यांनी पहिल्या आणि दुसऱ्या बागाचेही दिग्दर्शन केले होते. आता तिसऱ्या भागाचेही दिग्दर्शन ते करतील.
प्रशांत नील यांनी सोशल मीडियावर चित्रपटाच्या स्क्रिप्टची एक झलक शेअर केलीय. ती स्क्रिप्ट थोडी जळालेली दिसतेय. स्क्रिप्टनर KGF चॅप्टर ३ लिहिलं.. सोबतच लिहिलंय-फायनल ड्राफ्ट. प्रशांत नील यांची ही पोस्ट वहायरल होत आहे. असेही म्हटले जात आहे की, ही शेवटची फ्रेंचायजी असेल.
एका सोशल मीडिया युजरने म्हटले आहे- यशला रॉकी भाईच्या भूमिकेत पाहायला खूप उत्सुक आङे. अनेक फॅन्सनी चित्रपटाला आधीच ब्लॉकबस्टर म्हटले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, बॉक्स ऑफिसवर ३ हजार कोटींचे कलेक्शन करेल.
दरम्यान, त्याचा 'टॉक्सिक: अ फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स' चित्रपट चर्चेत आहे. टॉक्झिकच्या सेटवरून यशचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात तो सिगारेट ओढताना दिसतोय. मोठी दाढी, निळ्या रंगाची डेनिम घालून तो बाल्कनीत उभा असलेला दिसतोय. त्याचा स्वॅग पाहून लोक म्हणत आहेत की, बॉक्स ऑफिसवर सुनामी येणार आहे. काही जणांनी 'ब्लॉकबस्टर लोडिंग' म्हटले आहे. हा एक ऐतिहासिक गँगस्टर ड्रामा असल्याचे म्हटले जात आहे. 'टॉक्सिक: अ फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स'ची कथा गीतू मोहनदास आणि यशने लिहिलीय.