Sunny Deol : सनी देओलने ऐश्वर्यासोबत एकही चित्रपट का केला नाही!

Sunny Deol : सनी देओलने ऐश्वर्यासोबत एकही चित्रपट का केला नाही!

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा ( Sunny Deol ) 'गदर २' या चित्रपटाची यशस्वी घौडदौड सुरू आहे. या चित्रपटाने अवघ्या ३० दिवसांत ५१५.१३ कोटींचा टप्पा पार केला आहे. दरम्यान सनी देओलने बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत एकही चित्रपट का करता आले नाही? याबद्दलचा खुलासा एका मुलाखतीत केला आहे.

नुकतेच सनी देओल ( Sunny Deol ) छोट्या पडद्यावरील 'आप की अदालत' मध्ये बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत एकही चित्रपट का करता आला नाही? याबद्दलची माहिती दिली आहे. सनी ऐश्वर्या रायसोबत जुन्या 'इंडियन' या चित्रपटात पहिल्यांदा डेब्यू करणार होते. या चित्रपटात सनी आणि ऐश्वर्या पहिल्यांदा एकत्रित स्क्रिन शेअर करणार होते. चित्रपटाच्या काही गाण्याचे शूटिंगही पार पडले होते. मात्र, चित्रपटाच्या बजेटमुळे चित्रपट थांबवावा लागला. यामुळे मला ऐश्वर्यासोबत काम करता आले नसल्याचे त्याने सांगितले.

सनी देओल आणि ऐश्वर्याची जोडी पडद्यावर दिसली असती तर चाहत्यांनी ती खूपच आवडली असती. मात्र, असे झाले नाही. यामुळे चाहत्यांची निराशा झाली. दरम्यान, सनीने अभिनेता शाहरूख खानसोबत गंमतीने केलेल्या भांडण्याचा उल्लेखही मुलाखतीत केला आहे.

'गदर २' ने पहिल्या आठवड्यात २८४.६३ कोटी, दुसऱ्या आठवड्यात १३४. ४७ कोटी, तिसऱ्या आठवड्यात ६३. ३५ कोटी, चौथ्या आठवड्यात २७.५५ कोटी आणि पाचव्या आठवड्यात ५. ३ कोटी अशी एकूण मिळून ५१५. १३ कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटात सनीसोबत अभिनेत्री अमिषा पटेल मुख्य भूमिकेत दिसली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news